Mamata Banarji & Amithabh Bacchan : ‘अमिताभ बच्चन माझ्यासाठी भारतरत्न’; ममता बॅनर्जींनी बिग बींना बांधली राखी

Amitabh Bacchan & Mamata Banarji
Amitabh Bacchan & Mamata Banarji

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mamata Banarji & Amithabh Bacchan : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याला राखी बांधून बच्चन कुटुंबीयांसोबत रक्षाबंधन साजरे केले. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या अमिताभ बच्चन हे माझ्यासाठी 'भारतरत्न' आहेत.

मुंबईत आजपासून विरोधकांच्या INDIA आघाडीची बैठक सुरू होत आहे. या बैठकीसाठी ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी भेट दिली. Mamata Banarji & Amithabh Bacchan

अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील निवासस्थानी ममता बॅनर्जी यांचे बच्चन कुटुंबीयांकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन देखील उपस्थित होते. तसेच अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा यांचीही ममता यांनी भेट घेतली.

Mamata Banarji & Amithabh Bacchan : अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अमिताभ बच्चन यांना दुर्गा पूजा आणि कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उत्साही उत्सवात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.

गेल्या वर्षी, अमिताभ बच्चन यांनी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात सहभाग घेतला होता. त्यावेळीही ममता बॅनर्जी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठित भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे अशी मागणी केली होती.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news