Shashi Tharoor : काँग्रेस नेते थरूर यांनी केले परराष्ट्र मंत्र्यांचे समर्थन, जाणून घ्या काय आहे कारण ? | पुढारी

Shashi Tharoor : काँग्रेस नेते थरूर यांनी केले परराष्ट्र मंत्र्यांचे समर्थन, जाणून घ्या काय आहे कारण ?

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : चीनने पुन्‍हा एकदा आपल्‍या नकाशात भारतातील भूभागातील दर्शवित खाेडसाळपणा केला आहे.  परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचा कथित नकाशा फेटाळून लावला आहे. केवळ मूर्खपणाचे दावे करून इतर लोकांचे प्रदेश आपले बनत नाहीत.  बीजिंगने यापूर्वीही असे नकाशे प्रसिद्ध केले होते, त्यामध्ये मालकी नसलेले भाग दाखवलेले होते आणि ही चीनची जुनी सवय आहे, अशा शब्‍दांमध्‍ये जयशंकर यांनी चीनचा समाचार घेतला आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर  यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्‍या विधानाचे समर्थन केले आहे. (Shashi Tharoor )

Shashi Tharoor : चीनची जुनी सवय आहे…

शशी थरूर यांनीही ‘चीनची जुनी सवय आहे, असे म्‍हटले आहे.’वन चायना पॉलिसी’ला आपण विरोध करू आणि तिबेटमधील लोकांना स्टेपल व्हिसा द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. थरूर यांनी एस. जयशंकर यांच्या विधानाचे समर्थन करत ट्विट केले की, ‘अरुणाचल प्रदेश चीनने दाखविलेल्या नकाशाला आम्ही विरोध केला आहे. आमच्या निषेधाकडेही  जयशंकर दुर्लक्ष करतात. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी आपण यापेक्षा अधिक काही करू शकतो का?

जयशंकर यांनी चीनला दिले चोख प्रत्युत्तर

चीनने साोमवारी खाेडसाळपणा करत आपल्‍या नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा समावेश केला. यावर  जयशंकर म्हणाले, “चीनने यापूर्वीही असे नकाशे जारी केले आहेत. चीनच्या मालकीच्या नसलेल्या प्रदेशांवर यापूर्वीही दावा केला आहे, जे इतर देशांचे आहेत. ही त्यांची जुनी सवय आहे. याची सुरुवात 1950 च्या दशकात झाली. त्यामुळे भारताच्या काही भागांवर दावा सांगणारा नकाशा सादर केल्याने मला वाटते की त्यात काहीही बदल होत नाही. ते भारताचा भाग आहेत.”

हेही वाचा :

Back to top button