Closing Bell Today | सेन्सेक्स ६५ हजारांवर बंद, JFS बनला टॉप गेनर, जाणून घ्या मार्केटमध्ये आज काय घडलं? | पुढारी

Closing Bell Today | सेन्सेक्स ६५ हजारांवर बंद, JFS बनला टॉप गेनर, जाणून घ्या मार्केटमध्ये आज काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील मजबूत संकेतांमुळे आज मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढले. सेन्सेक्स आज ७९ अंकांनी वाढून ६५,०७५ वर बंद झाला. तर निफ्टी ३४ अंकांच्या वाढीसह १९,३३९ वर स्थिरावला. आज मेटल, पॉवर आणि रियल्टी प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. तर पीएसयू बँक, FMCG आणि फार्मा शेअर्समध्ये विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. (Closing Bell Today)

‘हे’ शेअर्स वाढले, ‘हे’ घसरले

सेन्सेक्स आज ६५,२०१ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,२२९ पर्यंत वाढला. पण बाजार बंद होताना ते ६५ हजारांच्या खाली घसरला. सेन्सेक्सवर जियो फायनान्सियलचा शेअर सर्वाधिक सुमारे ५ टक्क्यांनी वाढला. टाटा स्टील, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. एचसीएल टेक, अल्ट्राटेक, एलटी, एचडीएफसी बँक, एम अँड एम, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स हे शेअर्सही वधारले. तर भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, ॲक्सिस बँक, रिलायन्स हे शेअर्स सुमारे १ टक्क्यांनी घसरले.

JFS चा शेअर टॉप गेनर

जियो फायनान्सियलच्या शेअर (Shares of Jio Financial Services) आजच्या ट्रेडिंग सत्रात सुमारे ५ टक्क्यांनी वाढून २२२ रुपयांवर पोहोचला. गेल्या सात पैकी सहा ट्रेडिंग सत्रांत हा शेअर घसरला आहे. हा शेअर गेल्या काही दिवसांत सुमारे २० टक्क्यांनी खाली आला आहे. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल २५ हजार कोटींनी कमी झाले आहे. बाजार भांडवल १.६१ लाख कोटी रुपयांवरून १.३६ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. आज हा शेअर सेन्सेक्सवर टॉप गेनर राहिला. आज हा शेअर ५ टक्के वाढून २२२ रुपयांवर पोहोचला.

रिलायन्सला १ लाख कोटींचा फटका

आज रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​बाजार भांडवल (एम-कॅप) मंगळवारपर्यंतच्या १० ट्रेडिंग सत्रांमध्ये सुमारे १ लाख कोटींनी कमी झाले आहे. रिलायन्सची काल वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतरही RIL च्या बाजार भांडवलात काही भर पडली नाही. मंगळवारी सकाळी रिलायन्सचे बाजार भांडवल १६,३८,०२४ कोटी होते. जे १४ ऑगस्टच्या १७,४३,४५७ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलापेक्षा १.०५ लाख कोटींनी कमी आहे. आरआयएलच्या एजीएममधील घोषणा मोठ्या प्रमाणात तटस्थ होत्या, बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे. (Closing Bell Today)

अदानी समूहातील शेअर्स वाढले

अदानी समूहातील शेअर्समध्ये (Shares of Adani group) आज वाढ दिसून आली. गुंतवणुकदारांचे सर्वोच्च न्यायालयातील अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर २ टक्क्यांपर्यंत वाढला. आज १० पैकी ९ शेअर्सनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला. अदानी पॉवर, अंबुजा सिमेंट्स आणि अदानी पोर्ट्स हे शेअर्स सुमारे १ टक्क्यांनी वाढले होते.

जागितक बाजार

आशियाई बाजारातील सेऊल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमधील शेअर बाजारातही तेजी राहिली. अमेरिकेतील शेअर बाजारात काल पॉझिटिव्ह ट्रेंड दिसून आला होता. याचा मागोवा घेत आशियाई बाजारातही मजबूत स्थिती दिसून आली.

 हे ही वाचा :

Back to top button