FirstCry च्या संस्थापकाला कर चुकवेगिरी प्रकरणी दणका, बजावली नोटीस | पुढारी

FirstCry च्या संस्थापकाला कर चुकवेगिरी प्रकरणी दणका, बजावली नोटीस

पुढारी ऑनलाईन : कर चुकवेगिरी प्रकरणी देशातील कर विभागाने तीन भारतीय युनिकॉर्न फर्स्टक्राय (FirstCry.com), ग्लोबलबीज ब्रँड्स (Globalbees Brands) आणि एक्सप्रेसबीज (Xpressbees) च्या संस्थापकाची चौकशी करत आहे. याबाबतचे वृत्त ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेने दिले आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कर विभागाने FirstCry चे संस्थापक सुपम माहेश्वरी यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडे जे FirstCry चे शेअर्स आहेत त्याच्याशी संबंधित व्यवहारांवरील ५ कोटी ($50 million) डॉलरहून अधिक कर का भरला नाही, अशी विचारणा त्यांना बजावलेल्या नोटिशीतून करण्यात आली आहे.

प्रायव्हेट इक्विटी फर्म ChrysCapital Management Co आणि सुनील भारती मित्तल यांच्या कार्यालयासह FirstCry मधील किमान सहा गुंतवणूकदारांचीही या प्रकरणाशी संबंधित चौकशी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी माहेश्वरी कर विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करत आहे.

अनेक वर्षे तोट सहन केल्यानंतर फर्स्टक्रायने ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात नफा नोंदवला होता. हे भारतातील काही स्टार्टअप्सपैकी एक आहे जे ऑपरेशनल स्तरावर फायदेशीर राहून त्यांचा IPO बाजारात आणण्याच्या तयारीत असल्याचे ब्लूमबर्गने वृत्तात पुढे म्हटले आहे.

फर्स्टक्राय हे नवजात आणि बेबी, किड्स प्रोडक्ट्स विक्रीचे भारतातील मोठे ऑनलाइन स्टोअर आहे. यात महिंद्रा रिटेलची १२-१३ टक्के आणि अजीज प्रेमजी इनव्हेस्टची ९-११ टक्के हिस्सा आहे.

 हे ही वाचा :

Back to top button