नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: प्रधानमंत्री जन-धन योजनेला (पीएमजेडीवाय) ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी (दि.२८) देशवासियांना शुभेच्छा दिल्या. योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या ठोस उपाययोजना तसेच डिजिटल परिवर्तनाने देशात आर्थिक समावेशनात क्रांती आणली आहे. जन धन खाती उघडून ५० कोटींहून अधिक देशवासियांना अधिकृत बँकिंग व्यवस्थेत आणण्यात आले आहे, अशी भावना सीतारामण यांनी यक्त केली. (Jan Dhan accounts)
योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या एकूण खात्यांपैकी ५५.५ टक्के खाते महिलांची तर ६७ टक्के खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत. या खात्यातील एकूण ठेवी २ लाख कोटी रूपयांहून अधिक आहे. यासोबतच २ लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण प्रदान करणारी जवळपास ३४ कोटी 'रुपे कार्ड' या खात्यांसाठी कुठल्याही शुल्क शिवाय जारी करण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. (Jan Dhan accounts)
आतापर्यंत ५० कोटी ९ लाख जन धन खाते उघडण्यात आली असून यातील २७ कोटी ८२ लाख खाती महिलांची तर ३३ कोटी ४५ लाख खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत. योजनेच्या पहिल्याच वर्षात १७ कोटी ९० लाख खाती उघडण्यात आली. प्रत्येक खात्यातील ठेवींची सरासरी ४ हजार ६३ रुपये एवढी आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे.
हेही वाचा