Hemant Soren : बेकायदेशीर खाण प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स | पुढारी

Hemant Soren : बेकायदेशीर खाण प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना 3 नोव्हेंबर रोजी बेकायदेशीर खाण प्रकरणी चौकशीसाठी रांचीस्थित कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच याप्रकरणी त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे.

दरम्यान, या प्रकरणात ईडीने यापूर्वी सोरेन  (Hemant Soren) यांचे सहकारी पंकज मिश्रा यांच्यासह तीन आरोपींना अटक केली होती. मिश्रा आणि इतरांविरुद्ध झारखंडच्या साहिबगंजमधील बरहरवा पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर या सर्वांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

राजकीय संरक्षण प्राप्त असलेल्या पंकज मिश्रा याने हा अवैध खाण घोटाळ्यात सामील आहेच पण बोट वाहतुकीचा धंदाही तो करीत असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. मिश्रा याच्याविरोधात भारतीय दंड संहिता, विस्फोट प्रतिबंधक कायदा, शस्त्रबंदी कायद्यानुसारही गुन्हे दाखल आहेत. छापे टाकण्यात आले होते, तेव्हा त्याच्याकडून पाच कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती. तसेच 13.32 कोटी रुपयांच्या बँक ठेवींवर टाच आणण्यात आली होती. इनलँड इन्फ्रालिंक 3 नावाची बोट, पाच स्टोन क्रशर्स, दोन हायवा ट्रक्सदेखील ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button