‘ब्रिक्स’ परिषद : पंतप्रधान मोदी-चीनच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांमध्‍ये अनौपचारिक संवाद | पुढारी

'ब्रिक्स' परिषद : पंतप्रधान मोदी-चीनच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांमध्‍ये अनौपचारिक संवाद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग आज (दि.२४) एक व्‍यासपीठावर आले. निमित्त होते दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेचे. दोन्‍ही नेते एकत्र व्‍यासपीठावर गेले. यावेळी दोघांनी अनौपचारिक संवादही साधला. ब्रिक्‍स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग आज एकत्र आले. दोन्‍ही नेते जोहान्सबर्ग येथे व्‍यासपीठावर एकत्र आले. ( BRICS summit 2023 )

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी आज ब्रिक्समध्ये सहा नवीन देशांचा समावेश करण्याची घोषणा केली. या नवीन देशांमध्‍ये इजिप्त, सौदी अरेबिया, यूएई, इथिओपिया, अर्जेंटिना आणि इराण यांचा समावेश आहे. हे देश  जानेवारी २०२४ पासून ब्रिक्सचे अधिकृत सदस्य असतील.

BRICS summit 2023 : ब्रिक्सचा विस्ताराचा निर्णय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

संयुक्‍त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही ब्रिक्सच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे की, समूहातील नवीन सदस्य देशांसोबत काम करून आम्ही ब्रिक्सला नवीन गतिमानता देण्‍यात यशस्‍वी होवू.
ब्रिक्सच्या विस्तारासाठी मार्गदर्शक तत्त्वे, मानके, निकष, कार्यपद्धती यावर आमच्या संघांनी एकत्रितपणे एकमत केले याचा मला आनंद आहे, असे असे ट्विटही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. .

BRICS मध्ये कोणते देश समाविष्ट आहेत?

सध्‍या ब्रिक्समध्ये पाच देशांचा समावेश आहे. त्यांच्या नावांची पहिली अक्षरे एकत्र करून ब्रिक्सची स्थापना करण्यात आली आहे. BRICS मध्ये B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे भारत, C चा चीन आणि S म्हणजे दक्षिण आफ्रिका अशी आहे. BRICS हा जगातील पाच सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा समूह आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button