भारतीय बाजारात संथ कारभार | पुढारी

भारतीय बाजारात संथ कारभार

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

निफ्टी 50 निर्देशांक 118.15 पॉईंटस्नी घसरून (0.61%)19310.15 वर बंद झाला. सेन्सेक्स 374 पॉईंट्सनी घसरून (0.57%) 65000 च्या खाली 64948.66 वर बंद झाला. निफ्टी बँकही 348.05 (0.79%) घसरला आणि 43851.05 वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्सनी किंचित घसरण नोंदवली.

चीनमधील मंदीमुळे तेथून येणार्‍या मागणीत घट होण्याची शक्यता आणि विकसित राष्ट्रांमधील महागाई मधील ‘जैसे थे’ परिस्थितीमुळे तिथे व्याज दर वाढवण्याची शक्यता या दोन घटकांनी या आठवड्यात भारतीय बाजारांवर वर्चस्व प्रस्थापित केले. जोडीला परदेशी गुंतवणूक संस्थांचा भारतीय बाजारातील विक्रीचा सपाटा ही बाब कारणीभूत ठरली. या संस्थांनी गेल्या सप्ताहात 3379.31 कोटी रुपयांची विक्री केली.

कोचीन शिपयार्डमधील तेजीविषयी मागील लेखात लिहिले होते. अपार इंडस्ट्रीज हा शेअर मागील सप्ताहात 20 टक्क्यांहून अधिक वाढला. मागील एका वर्षात तो तीनशे टक्क्यांहून अधिक वाढला. कंडक्टर्स स्पेशालिटी ऑईल्स व लुब्रिकंटस् आणि पॉवर अ‍ॅड टेलिकॉम केबल्स या तीन सेक्टर्समधील काम करणारी ही मिडकॅप कंपनी आहे. त्या तीनही सेक्टर्समधील तीन मार्केट लिडर आहे. ऊर्जेची प्रचंड आवश्यकता, कंपनीचे मार्केटमधील प्रभुत्व, कंपनीचा नियोजित क्षमताविस्तार पाहता हा शेअर 10000 बघता बघता गाठेल असे
वाटते.

बुधवार, दि. 16 ऑगस्ट रोजी इंडिगो प्रवर्तक राकेश गंगवाल यांच्या पत्नी शोभा गंगवाल यांनी त्यांचा 2.99 टक्के भाग हिस्सा खुल्या बाजारात प्रती शेअर रु. 2426 ने विकून कमी केला. एकूण रु. 2800 कोटींचे हे र्इीश्रज्ञ ऊशरश्र होते. इंडिगोचे आणखी एक सहप्रवर्तक राहुल भाटिया यांच्याशी राकेश गंगवाल यांचा वाद सुरू आहे, त्याची ही परिणती असावी. सप्ताहात इंडिगोचा शेअर चार टक्क्यांनी घसरून शुक्रवारी 2443 वर बंद झाला.

स्मॉल फायनान्स बँकांचे शेअर्स गेल्या एका वर्षात चांगलेच तेजीत राहिले. कर्ज वितरणामध्ये (Credit Growth) चांगली वाढ झाल्यामुळे निव्वळ व्याजापासून मिळणारे उत्पन्न (NET INTEREST INCOME- NII) वाढले. त्याच्या जोडीला इतर स्रोतांपासून मिळणार्‍या उत्पन्नातील वाढ या कामगिरीस कारणीभूत ठरली प्रमुख तीन स्मॉल फायनान्स बँकांची गेल्या वर्षभरातील कामगिरी पाहा..

1) Equitas Small Finance Bank- 84.20%
– 84.20% Returns
yryodaya small Finance Bank- 100.76%
3) Ujjivan small Finance Bank – 134.38% Returns.

गेल्या सप्ताहात गडथ एपशीसू या शेअरचे बरेच मोठे र्इीश्रज्ञ ऊशरश्री झाले. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर साठ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तीन वर्षांपूर्वी हा शेअर रु.50 च्या आसपास होता. शुक्रवारी त्याचा बंद भाव होता रु. 361.50 म्हणजे तीन वर्षांत तो सात पटींनी वाढला आहे. एनजी सेक्टरमधील ही एक अग्रेसर कंपनी आहे. तिची उत्पादन क्षमता, येत्या दोन वर्षांत कंपनीचा नियोजित क्षमता- विस्तार करण्याचा निर्धार आणि ठशपशुरलश्रश एपशीसू वर कंपनीचा असलेला भर या गोष्टींमुळे अ‍ॅनालिस्टसनी या शेअरचे लक्ष बरेच वरचे दिले आहे.

आता थोडे बाजाराच्या इथून पुढील वाटचाली विषयी! शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना बाजार थांबलेला आवडत नाही. कळ काढणे (झरींळशपलश) ज्याला म्हणतात, ती गोष्ट त्यांच्याजवळ नसते. बाजाराने रोजच छशु कळसह नोंदवावा, असे त्यांना वाटते. 19 जुलैच्या निफ्टीच्या 19991 च्या सार्वकालीक उच्चांकानंतर निफ्टीला 19500 चा आकडाही पार करणे अवघड जात असले तरी 19300 च्या खालीही तो जात नाही, असे दिसते. हा बाजाराचा अलर्लीारश्ररींळेप झहरीश चा टप्पा पार पडला की भारतीय शेअर बाजार नवी उंच भरारी घेण्यास सुरुवात करेल.

31 जुलैच्या Dalal Street च्या अंकात LIC चे रिझर्व्ह अ‍ॅनालिस्ट आणि फंड मॅनेजर करण दोशी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. भारतीय बाजारात इथून पुढे तेजीच येणार असा विश्वास ते दर्शवतात आणि त्यामागे खालील कारणे विशद करतात.

 

  • 1) भारताची Productiveलोकसंख्या
  • 2) समाधानकारक जीडीपी वाढ
  • 3) महागाई आणि व्याज दर उताराला लागण्याची चिन्हे
  • 4) सशक्त External Balance
  • 5) FY23चे कंपन्यांचे आश्वासक निकाल
  • 6) परदेशी वित्त संस्थांचे पुनरागमन
  • 7) कमोडीटी प्राइसेसमधील करेक्शन.
  • ज्यांना भारतीय बाजाराविषयी तूर्त साशंकता वाटते, त्यांनी ही मुलाखत अवश्य वाचावी.

Back to top button