Chandrayaan-3 Mission मोठी बातमी: अखेर चांद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिंगची ‘तारीख’ आणि ‘वेळ’ ठरली ! ISRO ने दिली माहिती

Chandrayaan3
Chandrayaan3

पुढारी ऑनलाईन: भारताची चांद्रयान मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. इस्रोकडून आज (दि.२०) अधिकृतरित्या चांद्रयान-३ चंद्रावर उतरण्याची 'तारीख' आणि 'वेळ' जाहीर केली. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२३) सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ चे विक्रम लँडर मॉड्यूल चंद्रावर (Chandrayaan-3 Mission) उतरणार आहे. या संदर्भातील माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत ट्विटर (एक्स) हँडेलवरून दिली आहे.

भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. हे विक्रम लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागावर उतरताना देशासह परदेशी नागरिकांनाही पाहता येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-३ चे लँडिंग संस्थेच्या अधिकृत वेबसाइट, सोशल मीडिया हँडल, यूट्यूब आणि टेलिव्हिजनवर थेट प्रसारित Chandrayaan-3 Mission) केले जाईल, असेही इस्रोने म्हटले आहे.

Chandrayaan-3 Mission: आता लँडर मॉड्यूल चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर

चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूल वेगळे झाल्यानंतर विक्रम लँडर मॉड्यूलचे अंतिम डिबूस्टिंग ऑपरेशन रविवारी (दि.२०) मध्यरात्री यशस्वी झाले. यानाची LM कक्षा यशस्वीरित्या 25 किमी x 134 किमी पर्यंत कमी करण्यात आली आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे. आज रविवारी (दि.२०) पहाटे १.५० मिनिटांनी लँडर मॉड्यूलचे यशस्वी डिबूस्टिंग करण्यात आले. डिबूस्टिंगनंतर विक्रम लँडर मॉड्यूल सुस्थितीत आहे. आता लँडर मॉड्यूल चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर आहे. पहिले लँडर मॉड्यूल डिबूस्टिंग १८ ऑगस्टला करण्यात आले होते. त्यानंतर आज इस्रोने चांद्रयान बुधवारी(दि.२३) रोजी सायंकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अवघ्या विश्वाचे लक्ष या मोहिमेच्या यशाकडे लागले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news