Bihar News:बिहारमध्ये भरदिवसा अज्ञातांकडून पत्रकाराची हत्या | पुढारी

Bihar News:बिहारमध्ये भरदिवसा अज्ञातांकडून पत्रकाराची हत्या

पुढारी ऑनलाईन: बिहारमधील अररिया जिह्यातील राणीगंज येथे एका दैनिकाचे पत्रकार विमल यादव (३६) यांची आज (दि.१८) भरदिवसा हत्या करण्यात आली. विमल यादव यांना घराच्या बाहेर बोलावून गेटवरून चढत अज्ञातांनी या पत्रकाराच्या छातीत गोळी मारून हत्या केली. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास (Bihar News) करत आहेत.

एप्रिल 2019 मध्ये विमल यादवचा लहान भाऊ गब्बू यादव याची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी गब्बू यादव हे बेलसरा पंचायतीचे सरपंच होते. विमल हा त्याच्या भावाच्या खून खटल्यातील मुख्य साक्षीदार होता, अशी माहिती नातेवाईकांनी माध्यमांशी (Bihar News)  बोलताना सांगितली आहे.

पत्रकार विमल कुमार यादव यांची राणीगंज बाजार परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तपास सुरू असून गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती बिहारमधील अररिया जिल्ह्याचे एसपी अशोक कुमार सिंग (Bihar News) यांनी माध्यमांना दिली आहे.

सुपौल तुरुंगात बंद असलेल्या रुपेशने हत्येचा कट रचला नातेवाईकांचा संशय

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृताची ओळख, सदर रुग्णालयात पत्रकार, स्थानिक लोक आणि कुटुंबीयांची गर्दी झाली आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. सुपौल तुरुंगात बंद असलेल्या रुपेशने हत्येचा कट रचल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्याने तुरुंगातूनच हत्येचे आदेश दिले होते.

हेही वाचा:

Back to top button