PM Modi : भाजप कार्यकर्त्यांना पंतप्रधानांकडून विजयाचा कानमंत्र | पुढारी

PM Modi : भाजप कार्यकर्त्यांना पंतप्रधानांकडून विजयाचा कानमंत्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.१८) दमन आणि दीव मध्ये आयोजित पंचायत राज परिषदेला आभासी पद्धतीने संबोधित केले. कार्यक्रमातून पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आपण संघटना, संस्कार आणि समपर्णावर विश्वास ठेवतो. सामूहिकतेची मूल्ये आणि सामूहिक जबाबदारीसह आपण मार्गक्रम करीत आहोत. अशात जी जबाबदारी मिळाली, त्यामाध्यमातून सातत्याने आपली योग्यता आणि कौशल्य वाढवावे, असे आवाहन यानिमित्ताने पंतप्रधानांनी केले. क्षेत्रीय पंचायत राज परिषद कार्यक्रमात महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गोवा आणि दमन-दीव चे भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. (PM Modi)

संपूर्ण जिल्ह्यातील सर्वसामान्य नागारिक जोडले जातील, असे वर्षभरातून किमान ४ ते ५ कार्यक्रम सरकारच्या पंचायतच्या नेतृत्वात आयोजित करण्याच्या सूचना देखील पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना दिल्या. यापूर्वी ७० हजार कोटींचे अनुदान मिळत होते, आज ते ३ लाख कोटींहून अधिकच्या घरात पोहचले आहे. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक नवीन जिल्हा पंचायत भवन उभारले असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

जबाबदारीच्या माध्यमातून क्षमता वृद्धींगत करावी, एक दुसऱ्याकडून चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक दुसऱ्यासोबत जोडले जात संपर्कात राहण्याचा तसेच आपल्या भागातील नवीन घडामोडींचे माहितीचे आदान प्रदान करावे, असा सल्ला देखील पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना दिला.

गुजरातचा मुख्यमंत्री असताना बनवलेल्या कार्यशैलीचे बराच फायदा झाल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. दरवर्षी एक नवीन विषयाची निश्चिती होत असल्याने सामूहिक प्रयत्नांतून त्याला मोठे यश मिळत होते, असे ते म्हणाले. बालिकांच्या शिक्षणाचा विषय निवडल्यानंतर पोलीस विभाग, होमगार्ड तसेच डॉक्टर सर्वांना त्यांच्या कामाव्यतिरिक्त अतिरिक्तच्या काही वेळ देवून या विषयावर काम करावे लागले. संपूर्ण ताकद झोकल्यानंतर मिळणारे यश बरेच मोठे असते, असे पंतप्रधान म्हणाले.

संघटनेमुळे स्थानिक पातळीवरील माहिती लवकर मिळायची. ही माहिती अधिकाऱ्यासमक्ष ठेवल्यानंतर ते आश्चर्यचकित व्हायचे. यामुळे अधिकारी सदैव सतर्क राहत. तुम्हाला तुम्हच्या जिल्ह्याची प्रत्येक माहिती सातत्याने मिळत असेल, तर त्यामुळे तुमच्या कामगिरीत वाढ होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button