पुणे शहर सतत ’हाय अलर्ट’वर ; पंतप्रधान पाच वेळा शहरात

पुणे शहर सतत ’हाय अलर्ट’वर ; पंतप्रधान पाच वेळा शहरात
Published on
Updated on
पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहराचा चहूबाजूंनी विस्तार झाला तसा येथील स्थानिक यंत्रणांवरचा ताण वाढला. त्यात गेल्या काही वर्षांत व्हीव्हीआयपीची ये-जा वाढल्याने पुणे शहर सतत 'हाय अलर्ट'वर राहात आहे. यात पोलिस, विमानसेवा, हवामान विभाग प्रामुख्याने सतत 'हाय अलर्ट'वर असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना पुणे हीच राज्याची राजधानी असल्याचा फिल काही वर्षांपासून येत आहे.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून केंद्रीय पातळीवरील मोठे नेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे शहरात सतत दौरे होत आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतत 'हाय अलर्ट' मोडवर असते. रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावणे, वाहतुकीचे नियोजन करणे, ती योग्य ठिकाणी अडवणे ही कामे सतत वाढली आहेत. तर दुसरीकडे विमानतळांवर व्हीआयपीच्या विमानांची ये-जा वाढल्याने तेथेही पोलिस बंदोबस्त अन हवामान यंत्रणा विमान उड्डाणासाठी सतत 'अलर्ट मोड'वर ठेवावी लागत आहे.
पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्याचे दौरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजवर पाच वेळा शहरात आले. या वेळी तर शहराच्या गजबजलेल्या दाट वस्तीत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आल्याने सुमारे पाचशे मीटरपर्यंतचा परिसर बंद ठेवण्यात आला होता. रस्त्यांवर सर्वत्र पोलिसच दिसत होते. सुमारे तीन तास ते 'हाय अलर्ट'वर होते. त्यापाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीनच दिवसांनी पुण्यात आले तेव्हाही पोलिसांची प्रचंड धावपळ झाली. ते ज्या मार्गाने जाणार होते तेथील वाहतुकीचे नियोजन करताना मोठा बंदोबस्त ठेवला होता.
मुख्यमंत्र्यांचा झंझावाती दौरा
मागच्या वर्षी गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात येऊन सुमारे दहा गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पाची आरती केली. पुण्यात गर्दीच्या ठिकाणी ते फिरले, त्यामुळे अनेक भागातून वाहतूक वळवावी लागली. यात पोलिस यंत्रणेचे कसब पणाला लागले होते.
दगडूशेठ मंदिर, शनिवारवाडा,
लालमहालवर सतत बंदोबस्त…
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, कुणी व्हीआयपी येणार म्हटल्यावर वाहतूक यंत्रणेवर मोठा ताण येतो. गेल्या वर्षभरात जी-20 परिषदेच्या निमित्ताने दोन बैठका झाल्या. त्यावेळी 20 राष्ट्रांचे प्रतिनिधी शहरात आले होते. त्यांनी हेरिटेज वॉक दरम्यान हॉटेल
जे. डब्ल्यू. मेरिएट ते शनिवारवाडा, लालमहाल, नानावाडा आणि दगडूशेठ गणपती मंदिराला भेट देऊन आरती केली. त्यामुळे पुन्हा पोलिस, महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, विमानसेवा प्रशासन सतत 'अलर्ट मोड'वर होते. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त आणि पोलिस आयुक्त सतत दक्षता घेत होते.
 पुण्यावरचा वाहतुकीचा ताण खूप वाढतोय. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. माझी दोन्ही दादांना विनंती आहे की, आता शहर फार वाढू देऊ नका. हे शहर एकेकाळी मस्त, निवांत हवेचे ठिकाण होते. ते शहर पुणेकरांना परत द्या. 
                                                                                          – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
लोहगाव विमानतळ लष्करी असल्याने ते सतत अलर्ट मोडवर असते.  सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब योग्य आहे. त्यामुळे आपण आता नवे विमानतळ पुरंदरला करणार आहोत.
                                                                                            – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
पुण्यात वारंवार इतके मोठे नेते का येतात, केंद्रातील मंत्रीही येतात. कारण त्यांना सांगायचे आहे की, पुणेकरांवर आमचे लक्ष अन् प्रेमही आहे.
                                                                                            – नीलम गोर्‍हे , उपसभापती
हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news