Chandrayaan-3: लँडेर- प्रोपल्शन मॉड्यूल झाले वेगळे, आता असा असेल ‘चांद्रयान-३’चा पुढील प्रवास

Chandrayaan-3: लँडेर- प्रोपल्शन मॉड्यूल झाले वेगळे, आता असा असेल ‘चांद्रयान-३’चा पुढील प्रवास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षा पूर्ण करत आपल्‍या अंतिम टप्‍प्‍यातील प्रवासाला सुरूवात केली आहे. आता हळूहळू यानाची कक्षा इस्रोकडून कमी करण्यात येईल. बुधवार, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान -३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा इस्रोचा प्रयत्न आहे. त्यामुळे चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील लॅडिंगचे अवघ्या विश्वाला वेध (Chandrayaan-3) लागले आहेत. जाणून घेऊया 'चांद्रयान-३' च्‍या पुढील प्रवासाबदल…

'चांद्रयान'च्या प्रक्षेपनानंतर आज (दि.१७) सुमारे ३३ दिवसांनंतर प्रोपल्शन मॉड्युल आणि लँडर मॉड्युल वेगळे झाले. आता लँडर मॉड्युल चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेने पुढची वाटचाल करेल. लँडर आणि रोव्हर हे दोघेही पुढचे काही दिवस चंद्राच्या गुरूत्वाकर्षण कक्षेत विविध प्रयोग करतील, तर प्रोपल्शन मॉड्यूल ऑर्बिटरची भूमिका (Chandrayaan-3) बजावेल, असेही इस्रोने या पूर्वी स्‍पष्‍ट केले हाेते.

Chandrayaan-3: काय असेल प्रोपल्शन मॉड्यूलची भूमिका

चंद्राच्या कक्षा पूर्ण केल्यानंतर आज  यानातील प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे झाले आहेत. दरम्यान, हे दोन्ही मॉड्यूल पुढचे काही दिवस चंद्राच्या गुरूत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करेल त्यानंतर हे यान चंद्राच्या ऑर्बिटल कक्षा पकडेल. दरम्यान, प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या परिघातील वातावरणात फिरत राहिल. हे मॉड्यूल  चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणार्‍या रेडिएशनचा अभ्यास करेल तसेच पृथ्वीवरील जीवनचिन्हे दिसतात काय? याचाही अभ्यास करेल. हाच डेटा भविष्यात, इतर ग्रह, उपग्रह आणि तार्‍यांवर पृथ्वीप्रमाणे जीवन आहे काय, त्याचा शोध घेण्यास उपयुक्त ठरू शकतो, असे इस्रोने म्हटले आहे.

लँडर आणि रोव्हर परीघ लहान करत दक्षिण ध्रुवावर स्थिरावेल

चांद्रयान ३ ची गती ५ ऑगस्टपासून ते २३ ऑगस्टपर्यंत सातत्याने कमी करण्यात येईल. जेणेकरून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या हिशोबाने पाहिले तर चांद्रयान ३ ची गती खूप जास्त आहे. याला कमी करण्यासाठी १ किलोमीटर प्रति सेकंद इतकी गती कमी करावी लागेल. अर्थात ३६०० किलोमीटर प्रतितास या गतीने चांद्रयान चंद्राच्या ऑर्बिटला पकडेल. यादरम्यान एका क्षणी ते चंद्राच्या गुरूत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करेल. चंद्राला प्रदक्षिणा घालणे सुरू करेल. लँडर आपला परीघ लहान करत करत एका क्षणी चंद्रावर लँडिंग करेल. नंतर हळूहळू त्याला दक्षिणी ध्रुवावर उतरवण्यात येईल.

चांद्रयान-३ २३ ऑगस्टला चंद्रावर पोहचणार-इस्रो

SUV आकाराचा उपग्रह मुख्यतः एक मोठा प्रोपल्शन मॉड्यूल आहे जो विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला चंद्राच्या कक्षेत नेईल. जर सर्व काही योजनेनुसार झाले तर, चांद्रयान-३ ला चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न २३ ऑगस्ट रोजी केला जाईल. भारताला चंद्रावरील मातीचे विश्लेषण करण्याची, चंद्राच्या पृष्ठभागाभोवती फिरण्याची उत्सुकता असल्याचे इस्रोच्या प्रमुखांनी म्हटले होते.

लँडर, रोव्हर काय करणार?

२३ ऑगस्टला लँडर मॉड्यून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होईल. सॉफ्ट लँडिंग हे या मोहिमेचे खास वैशिष्ट्ये आहे. 'चांद्रयान-3' चंद्राच्या दक्षिण ध्रुवालगत सॉफ्ट लँडिंग करणारे जगातील पहिले स्पेसक्राफ्ट ठरेल. तसेच यशस्वी लँडिंगनंतर रोव्हर ते लँडर, लँडर ते ऑर्बिटर आणि ऑर्बिटर ते 'इस्रो'पर्यंत इलेक्ट्रॉनिक सिग्नल पोहचवत राहतील. लँडरमध्ये 5, रोव्हरमध्ये 2 उपकरणे आहेत. ते तापमान, माती आणि वातावरणातील घटक आणि वायूबद्दलची निरीक्षणे नोंदवतील, असे इस्रोने म्हटले आहे.

वापर केवळ दोघांचा…

चांद्रयान-2 अंतर्गत लँडरमध्ये 5 इंजिन होते. चांद्रयान-3 मध्ये लँडरला चार कोपर्‍यांवर चारच इंजिन असतील. चांद्रयान-2 मध्ये लँडरच्या मधोमध वापरलेले पाचवे इंजिन यावेळी काढून टाकण्यात आले आहे. चांद्रयान-3 मध्ये लँडिंगदरम्यान दोनच इंजिनचा वापर केला जाईल. आपत्कालीन स्थितीतच उर्वरित दोन इंजिन सुरू केले जातील. पृथ्वीप्रमाणे चंद्रावर वातावरण नसल्याने चंद्रावर लँडिंगवेळी वेगळ्या तंत्राने वेग कमी कमी करत न्यावा लागतो, हे येथे महत्त्वाचे, आहे, असेही इस्रोने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news