PM Modi on Manipur : मणिपूरमध्ये आता शांतता प्रस्थापित होत आहे – PM मोदी | पुढारी

PM Modi on Manipur : मणिपूरमध्ये आता शांतता प्रस्थापित होत आहे - PM मोदी

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi on Manipur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. पंतप्रधानांचे हे भाषण आतापर्यंतचे दुसरे सर्वात मोठे भाषण होते. ते 90 मिनिटे बोलले. त्यांच्या भाषणात अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. मात्र, मणिपूरच्या मुद्द्यावर सगळ्यांचे लक्ष एकवटले गेले. पंतप्रधान यांनी मणिपूरच्या समस्येवर शांतता प्रस्थापित करणे हाच उपाय असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आता मणिपूरमधून शांततेच्या बातम्या येत आहेत. देश मणिपूर सोबत आहे. गेल्या काही दिवसांपासून जी शांतता प्रस्थापित झाली आहे मणिपूरच्या लोकांनी तिला कायम ठेवत पुढे न्यावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात म्हटले आहे.

PM Modi on Manipur : देश मणिपूरच्या जनतेसोबत

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. अनेकांनी आपला जीव गमावलं. पण आता हळूहळू शांतता निर्माण होत आहे. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. शांततेनेच यावर तोडगा निघेल. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. मणिपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहतील, असे पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले. (77th Independence Day)

हे ही वाचा :

लाल किल्‍यावरील साेहळ्याकडे काँग्रेस अध्‍यक्षांनी फिरवली पाठ, पक्षाने सांगितले कारण

77th Independence Day | पीएम मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर फडकवला राष्ट्रध्वज

77th Independence Day | ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना, पीएम मोदींची स्वातंत्र्यदिनी घोषणा

Back to top button