77th Independence Day | ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना, पीएम मोदींची स्वातंत्र्यदिनी घोषणा | पुढारी

77th Independence Day | ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना, पीएम मोदींची स्वातंत्र्यदिनी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी, १५ ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला आणि त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली. देश आज 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संपूर्ण देश उत्साहात आहे. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या लोकांवर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाची सुरुवात मेरे प्यारे परिवारजन असं म्हणत केली. (77th Independence Day)

पंतप्रधान यांच्याकडून विकसित भारत बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत, मणिपूर, शेतकरी, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक विविध विषयावर भाष्य केलं. मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. अनेकांनी आपलं जीवन गमावलं. मात्र आता हळूहळू शांतता निर्माण होत आहे. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. शांततेनेच यावर तोडगा काढला जाईल, असे पीएम मोदी आपल्या भाषणातून म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले, ‘ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू होणार आहे. देशातील या योजनांचा फायदा लाखो लोकांना झाला आहे. पारंपारिक कौशल्य असलेल्यांसाठी पुढील महिन्यात सरकार 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या वाटपासह विश्वकर्मा योजना सुरू करेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात केली.

ते पुढे बोलताना म्हणाले, आज देशाला जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. जी-20 परिषदेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामुळे भारतीयांची क्षमता जगासमोर आली, असं मोदी म्हणाले.

मणिपूर समस्येवर शांततेतून तोडगा काढला जाईल

पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर समस्येवर भाष्य केलं आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. अनेकांनी आपला जीव गमावलं. पण आता हळूहळू शांतता निर्माण होत आहे. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. शांततेनेच यावर तोडगा निघेल. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. मणिपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहतील असे पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले. (77th Independence Day)

येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा

पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देशातील तरुणांना जेवढे भाग्य लाभले आहे तेवढे क्वचितच कुणाला मिळते.आपण ते गमावू नये. येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा असणार आहे. आपली छोटी शहरे आणि शहरे लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असतील पण त्यांची क्षमता कोणापेक्षाही मागे नाही. देशात संधींची कमतरता नाही. आपल्याला पाहिजे तितक्या संधी देण्याची क्षमता या देशामध्ये आहे.बदलत्या जगाला भारत आकार देणार आहे.

सामर्थ्य देशाचं भाग्य बदलेल, आता थांबायचं नाही

आज जगात 30 वर्षापेक्षा कमी वयाची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे.याच्या बळावर आपण बरच काही साध्य करु शकतो. आता आपल्याला थांबायच नाहीय, दुविधेमध्ये जगायच नाहीय, गमावलेली समृद्धी परत मिळवायची आहे. आपण जे काही निर्णय घेऊ, ते पुढच्या 1000 वर्षाची दीशा निर्धारित करतील. आपल्याकडे लोकशाही आणि विविधता आहे. जगातील देश वयोवृद्ध होत चालले आहेत. पण भारत युवा होतोय. आज घेतलेल्या निर्णयाने भविष्य निश्चित होईल. सामर्थ्य देशाचं भाग्य बदलेल. आता थांबायचं नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोनानंतर जागतिक समीकरणं बदलली

मोदींकडून लाल किल्ल्यावरील भाषणात कोरोना काळातील कामाचा उल्लेख करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, कोरोना काळात जगाने भारताची ताकद पाहिली आहे. कोरोनानंतर जागतिक समीकरणं बदलली, आता भारताची संधी, त्यामुळे ही संधी सोडायची नाही, असे आवाहन मोदींने भारतीयांना केले आहे.

हे ही वाचा :

Back to top button