77th Independence Day | पीएम मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर फडकवला राष्ट्रध्वज | पुढारी

77th Independence Day | पीएम मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर फडकवला राष्ट्रध्वज

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, 15 ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला आणि त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. यावेळी त्यांचे भाषण हे 2024 च्या निवडणुकीआधीचे शेवटचे भाषण आहे. राजधानीत होणार्‍या या मुख्य सोहळ्यासाठी 1,800 विशेष निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. (77th Independence Day)

पंतप्रधान मोदी हे लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावणारे चौथे पंतप्रधान आहेत. याआधी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग या तीनच पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून किमान दहा वेळा तिरंगा फडकावला आहे. पंतप्रधान मोदी यांनी 2014 पासून लाल किल्ल्यावरून महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

कडेकोट सुरक्षा

या सोहळ्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एनएसजी, एसपीजी, सीएपीएफ, दिल्ली पोलिस यांच्याकडे सुरक्षाव्यवस्थेचा जिम्मा सोपवण्यात आला आहे. निमलष्करी दलाकडे लाल किल्ल्याच्या 200 मीटरचा परीघ सोपवण्यात आला असून, त्या पलीकडचा भाग दिल्ली पोलिसांच्या निगराणीत असेल. या बंदोबस्तासाठी 10 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून, एक हजार फेशिअल रिकग्निशन कॅमेरे, ड्रोन विरोधी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. (77th Independence Day)

Back to top button