द्रमुक नेते सेंथिल यांच्‍या भावाला अटक, ‘ईडी’ची मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई | पुढारी

द्रमुक नेते सेंथिल यांच्‍या भावाला अटक, 'ईडी'ची मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मनी लॉड्रिंग प्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) तामिळनाडूचे मंत्री व द्रमुक नेते सेंथिल बालाजी
(Senthil Balaji) यांच्या भावाला अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली आहे.

सेंथिल बालाजी यांचा भाऊ अशोक यांना ईडीने केरळमधील कोची येथे अटक केली. अनेक समन्स बजावूनही ते चौकशीला हजर राहिले नसल्‍याने ही कारवाई केल्‍याचे सूत्रांनी सांगितले. सेंथिल बालाजी यांच्‍याविरोधात तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केल्यानंतर २४ तासांमध्‍येच ही कारवाई झाली आहे.

ईडीने अशोक यांची व त्‍यांच्‍या पत्‍नीची मालमत्ता १० ऑगस्‍ट रोजी सील केली होती. बालाजी सिंथल हे अण्‍णाद्रमुक सरकार काळात वाहतूक मंत्री हेते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सेंथिल बालाजीला १४ जून रोजी अटक करण्यात आली होती. ईडीने पाच दिवसांच्या चौकशीनंतर शनिवारी १२ ऑगस्‍ट रोजी सेंथिल बालाजीला २५ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने सेंथिल यांच्या सुटकेसाठी दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावली आहे. सेंथिल बालाजी हे सध्‍या पुझल सेंट्रल कारागृहात आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button