Rajasthan CM Ashok Gehlot : राजस्थानमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना सरकारी नोकऱ्या नाहीत – अशोक गेहलोत | पुढारी

Rajasthan CM Ashok Gehlot : राजस्थानमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना सरकारी नोकऱ्या नाहीत - अशोक गेहलोत

पुढारी ऑनलाइन डेस्क : Rajasthan CM Ashok Gehlot : राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांत महिलांविरोधी गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भिलवाडा आणि जोधपूरच्या घटनांनी देशाला हादरवले आहे. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना आणि गुन्हेगारी कारवायांचा इतिहास असणाऱ्यांना राजस्थानच्या सरकारी नोकरी मिळणार नाही. राज्यातील सरकारी नोकरीसाठी ते अपात्र ठरवले जाईल.

याबाबत अशोक गेहलोत यांनी हिदीत ट्विट केले आहे की, “राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की, छळ, लैंगिक गैरवर्तनाचे प्रयत्न, लैंगिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना किंवा गुन्हेगारीचा इतिहास असणाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांपासून बंदी घालण्यात येईल.”

Rajasthan CM Ashok Gehlot : महिलांविरोधी घृणास्पद गुन्ह्यांवरून भाजपचा काँग्रेसला घेराव

राजस्थान गेल्या अनेक दिवसांपासून महिलां विरोधात घृणास्पद गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. गेल्या आठवड्यात 2 ऑगस्टला भीलवाडा जिल्ह्यात कोळशाच्या भट्टीत एका चार वर्षीय मुलीवर कथित सामूहिक बलात्कार आणि हत्या करण्यात आली. चार वर्षाच्या चिमुरडीसोबत घडलेल्या या घृणास्पद घटनेने राजस्थानासह संपूर्ण देश हादरला आहे. तर जोधपूरची देखील घटना घृणास्पद आहे. दरम्यान भिलवाड्यातील घटनाप्रकरणी एका महिलेसह सात जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, राजस्थानमध्ये महिलांविरोधात घडत असलेल्या निर्घृण गुन्ह्यांविरोधात राजस्थानमधील काँग्रेस सरकारला भाजपने चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपने महिलांविरोधी गुन्हे रोखण्यासाठी सरकारचा निषेध नोंदवला आहे.

Rajasthan CM Ashok Gehlot : अशोक गेहलोत यांच्याकडून निषेध

भिलवाडा आणि जोधपूरच्या घटनांचा अशोक गेहलोत यांनी निषेध केला आहे. अशोक गेहलोत म्हणाले की, त्यांच्या सरकारने भीलवाडा आणि जोधपूर सारख्या घटनांना गांभीर्याने घेतले आहे आणि राज्य पोलिसांना महिलांवरील गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या लोकांशी कठोरपणे वागण्याचे निर्देश दिले आहेत.

“भिलवाडा येथील घृणास्पद घटनेत पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना लवकरात लवकर लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात आरोपपत्र सादर करून कठोर शिक्षा दिली जाईल,” असे गेहलोत यांनी ट्विट केले होते.

हे ही वाचा :

Back to top button