Parliament Monsoon Session | राज्यसभेतील तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन अधिवेशनातून निलंबित | पुढारी

Parliament Monsoon Session | राज्यसभेतील तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन अधिवेशनातून निलंबित

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना संसदेच्या उर्वरित अधिवेशन कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. सभागृहातील बेशिस्त वर्तनामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सतत सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणणे, सभापतींची अवमानना करणे आणि सभागृहात सतत गोंधळ निर्माण केल्याचे कारण देत ओब्रायन यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृह नेते पियूष गोयल यांनी मांडला होता. त्यानंतर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ओब्रायन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. (Parliament Monsoon Session)

या निलंबनाच्या आदेशानंतर प्रचंड गदारोळ झाल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. धनखड आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार यांच्यात राज्यसभेत जोरदार शाब्दिक चकमक उडाल्यानंतर ओब्रायन यांचे निलंबन करण्यात आले.

ओब्रायन यांनी मणिपूर मुद्यावर गंभीर चर्चेची मागणी लावून धरली. “तुम्ही सभागृहाची सभ्यता बिघडवली आहे. तुम्ही हे जाणूनबुजून केले आहे,” असे धनखड यांनी ओब्रायन यांना उद्देशून म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्तावावर आज चर्चा होत असतानाच डेरेक ओब्रायन यांचे निलंबन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मणिपूर मुद्यावरुन राज्यसभेत गदारोळ सुरु आहे. याआधी आपचे खासदार संजय सिंह यांनीही संसदेचे संपूर्ण अधिवेशन कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. (Parliament Monsoon Session)

हे ही वाचा :

Back to top button