विरोधी पक्षांचा स्‍वत:वरच ‘अविश्‍वास’ : पंतप्रधान मोदी | पुढारी

विरोधी पक्षांचा स्‍वत:वरच 'अविश्‍वास' : पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभेत आजपासून (दि.८) अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होणार आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेपूर्वी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्‍लाबोल केला.

विरोधी आघाडी परस्‍पर अविश्‍वासाने ग्रस्‍त

यावेळी पंतप्रधान मोदी म्‍हणाले की, विरोधी आघाडी परस्पर अविश्वासाने ग्रस्त आहे. सामाजिक न्यायाच्या गप्पा मारणाऱ्यांनी घराणेशाही आणि भ्रष्ट राजकारणातून देशाचे सर्वाधिक नुकसान केले. काही लोकांनी राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावरील मतदानाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हटले आहे. या उपांत्य फेरीत आम्हाला विजय मिळवून देणाऱ्या खासदारांचे मी आभार मानतो, असेही त्‍यांनी नमूद केले.

हेही वाचा : 

 

Back to top button