राहुल गांधी यांचे संसदेत जोरदार स्वागत | पुढारी

राहुल गांधी यांचे संसदेत जोरदार स्वागत

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर खासदारकी बहाल झालेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे सोमवारी संसद भवनात काँग्रेस तसेच ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांच्या खासदारांनी जोरदार स्वागत केले. तब्बल 137 दिवसांनी गांधी यांचे संसदेत आगमन झाले. संसद भवनात आगमन झाल्यानंतर गांधी यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला नमन केले. त्यानंतर त्यांनी विविध नेत्यांशी संवाद साधला.

गांधी यांच्या पुनरागमनामुळे काँग्रेसच्या नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा जोश काँग्रेस मुख्यालयातही पहावयास मिळाला. खासदारकी बहाल होत असल्याची बातमी आल्यानंतर लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी पक्षाध्यक्ष मलि्लकार्जुन खर्गे यांच्या तोंडात लाडू भरवला तर खर्गे चौधरी यांच्या तोंडात लाडू भरत आनंद व्यक्त केला. देशवासियांसाठी आणि विशेषतः वायनाडच्या लोकांसाठी हा निर्णय दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया नंतर खर्गे यांनी दिली. भाजप आणि मोदी सरकारने आपला जो बाकीचा कार्यकाळ उरलेला आहे, त्यात विरोधी पक्ष नेत्यांना टार्गेट करण्यापेक्षा देशाच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला खर्गे यांनी दिला.

हेही वाचा : 

Back to top button