MonsoonSession : लोकसभेचे कामकाज पुन्हा दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब | पुढारी

MonsoonSession : लोकसभेचे कामकाज पुन्हा दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेनंतर आता लोकसभेचे कामकाजही दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. आज सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.

लोकसभा सचिवालयाने आज राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व बहाल केले आहे. यानंतर I.N.D.I.A. विरोधी आघाडीच्या नेत्यांनी संसद भवन संकुलात राहुल गांधी आणि विरोधकांच्या एकजुटीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तहकूब झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले होते. राहुल गांधीही संसदेच्या कामकाजात सहभागी होत आहेत. मात्र विरोधकांच्या गदारोळमुळे पुन्हा कामकाज २ पर्यंत तहकूब केले आहे.

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज संसदेच्या उच्च सभागृहात, राज्यसभेत मांडले जाणार आहे. गृहमंत्री अमित शहा हे विधेयक राज्यसभेत मांडणार आहेत. त्याचवेळी काँग्रेसने आपल्या राज्यसभा खासदारांना व्हीप जारी केला आहे. या व्हिपमध्ये राज्यसभेचे कामकाज तहकूब होईपर्यंत खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने एनडीए सरकारला राज्यसभेतही हे विधेयक सहज मंजूर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा  : 

Back to top button