

मुजफ्फरनगर; वृत्तसंस्था : शिक्षिकेच्या आदेशावरून मुस्लिम विद्यार्थ्याला अन्य विद्यार्थ्यांकडून मारहाण करण्यात आल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नेहा पब्लिक स्कूल या शाळेचे कामकाज तूर्त थांबवण्याचे आदेश उत्तर प्रदेशच्या शिक्षण खात्याने दिले आहेत. या शाळेला नोटीसही बजावण्यात आली आहे.
गृहपाठ केला नाही म्हणून सात वर्षीय मुस्लिम विद्यार्थ्याला अन्य विद्यार्थ्यांकडून मारहाण झाल्याची ही वादग्रस्त घटना २४ ऑगस्ट रोजी घडली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. तसेच मुलांची गैरसोय होऊ नये त्यांची व्यवस्था तेथील जवळच्या अन्य शाळेत करण्यात आली आहे. आम्ही आमच्या मुलाला शाळेत न पाठवण्याचे ठरवले आहे, असे मारहाण झालेल्या मुलाच्या पालकांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे ही शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने जारी केल्यानंतरही संबंधित शिक्षिका त्रुप्ता त्यागी यांनी ही तर एक छोटी घटना असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, काही लोक राईचा पर्वत करत आहेत. या घटनेला हेतूपूर्वक धार्मिक रंग दिला आहे.
दरम्यान, मुजफ्फरनगरची घटना ताजी जम्मू-काश्मीरमधील कठुआ असतानाच जिल्ह्यातील शाळेत एका विद्यार्थ्याने फळ्यावर 'जय श्रीराम' लिहिल्याने शिक्षकाचा संताप अनावर झाला. शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला बदडून काढले. यानंतर त्या शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद हाफिज आणि संबंधित शिक्षक मोहम्मद फारूख अशा दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर दोघांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा :