Laptop Import Ban | लॅपटॉप, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर निर्बंध, निर्णयाची अंमलबजावणी ३ महिने पुढे ढकलली | पुढारी

Laptop Import Ban | लॅपटॉप, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर निर्बंध, निर्णयाची अंमलबजावणी ३ महिने पुढे ढकलली

पुढारी ऑनलाईन डेस्क : लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा सरकारचा निर्णय आता १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी रात्री जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये निर्बंध लागू करण्याची अंतिम मुदत वाढवली. या अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, आधीच आयात केलेला सर्व माल ३१ ऑक्टोबरपर्यंत परवान्याशिवाय आयात करता येईल. १ नोव्हेंबरपासून या वस्तूंच्या आयातीसाठी परवाना अनिवार्य असेल. लॅपटॉप, टॅब्लेट, संगणक, अल्ट्रा-स्मॉल संगणक आणि सर्व्हर या अधिसूचनेच्या कक्षेत येतील.

लॅपटॉप, टॅबलेट, अल्ट्रा स्मॉल फॅक्टर कॉम्प्युटर्स, सर्व्हर्स तसेच पर्सनल कॉम्प्युटर्सच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. वरील वस्तू एचएसएन- 8741 श्रेणीत येत असल्याने त्यावर निर्बंध घातले जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. आयटी उद्योगाने सरकारकडे ३-६ महिन्यांचा वेळ मागितला होता. त्याआधारे सरकारने उद्योगांना सुमारे ३ महिन्यांची मुदत दिली आहे. सरकारने लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅबलेट कॉम्प्युटरवरील आयात निर्बंध आदेशाची अंमलबजावणी ३१ ऑक्टोबरपर्यंत सुमारे तीन महिन्यांनी पुढे ढकलली आहे. ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना परवान्याशिवाय ही उपकरणे आयात करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. आता १ नोव्हेंबरपासून लॅपटॉपच्या आयातीवर निर्बंध लागू होणार आहेत.

लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅबलेट कॉम्प्युटर या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले असले तरी २० वस्तूंच्या प्रत्येक व्यवहाराला काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. संशोधन आणि विकास, टेस्टिंग, बेंचमार्किंग, इव्हॅल्यूशन, दुरुस्ती आणि इतर कामांसाठी जर वरील वस्तू लागणार असल्या तर त्याची आयात करता येईल. मात्र, काम संपल्यानंतर त्या वस्तूंची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी लागेल, असे विदेश व्यापार महासंचालनालयाकडून डीजीएफटी सांगण्यात आले आहे.

एचएसएन- ८७४१ श्रेणी म्हणजे काय?

एचएसएन- ८७४१श्रेणीत अल्ट्रा फॉर्म फॅक्टरवाले कॉम्प्युटर आणि सर्व्हर येतात. आतापर्यंत ही उत्पादने मागवणे सोपे होते, मात्र यावर आता कर भरणे बंधनकराक केले आहे. सॅमसंग, डेल, एसर आणि अ‍ॅपल सारख्या कंपन्या चीनसारख्या देशांतून भारत लॅपटॉप, टॅबलेट आणि सर्व्हरची आयात करतो. मात्र, केंद्र सरकारकडून देशातच लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि सर्व्हरच्या निर्मितीला वेग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळेच या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घातला आहे.

>

हेही वाचा :

Back to top button