Delhi Rape Case : जेवणाच्या बिलावरुन वाद, तरुणीला डेटवर घेऊन गेलेल्या पुरुषावर हॉटेल मालकाने केला ‘बलात्कार’

Delhi Rape Case
Delhi Rape Case

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील प्रीत विहार परिसरात रेस्टॉरंटमधील जेवणाच्या बिलावरून तरुणीला डेटवर घेऊन आलेल्या तरुणामध्ये आणि हॉटेल मालकामध्ये वाद झाला. यानंतर हॉटेल मालकाने आणि हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी तरूणाचे अपहरण करून त्याला युपीतील मुरादनगर येथे नेले व त्याच्यावर बलात्कार करुन अश्लिल व्हिडिओ बनवला. शिवाय, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ५० हजारांची मागणी केली. या प्रकरणी हॉटेल मालक आणि त्याच्या दोन सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. (Delhi Rape Case)

याबाबत अधिकची माहिती अशी की, हा वाद झाल्यानंतर पीडित पुरुषाकडे, पैसे नसल्यामुळे हॉटेल मालकाने तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील ८ हजार रुपये लुटले. या प्रकारानंतर हॉटेल मालक आणि सुरक्षा रक्षकांनी पीडित पुरुषाला विवेक विहार येथील विवेकानंद कॉलेजजवळ सोडून पळ काढला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तरुणाला हेडगेवार रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांनंतर पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर प्रीत विहार पोलिस ठाण्यात दरोडा, अपहरण, गैरवर्तन, खुनाचा प्रयत्न आणि अपहरण, गुन्हेगारी कट यासह विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रेस्टॉरंटचा मालक विकी आणि त्याच्या दोन सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. (Delhi Rape Case)

हॉटले मालकाने मुरादनगरमध्ये केले गैरकृत्य (Delhi Rape Case)

पीडित पुरूष एका खासगी कंपनीत काम करतो. काही दिवसांपूर्वी तरुणाने डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणीशी मैत्री केली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढू लागले. २७ जुलै रोजी तरुणीने पीडितेला विकास मार्गावरील एका रेस्टॉरंटमध्ये भेटण्यासाठी बोलावले. मुलीने बोलावल्यानंतर तो तिला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेला. तेथे दोघांनी दोन कोल्ड्रिंक्स आणि एक एनर्जी ड्रिंक घेतले, त्याचे बिल २६०० रुपये आले. वारेमाप बिल मागितल्यानंतर पीडित पुरूषाने कर्मचाऱ्यावर आक्षेप घेतला. यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याने गैरवर्तन केल्याचा आरोप करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्या मुलीला पीडित पुरुषाने डेटवर आणले होते त्याच मुलीने त्याच्या कानशिलात लगावली. यानंतर रेस्टॉरंट मालक आणि सुरक्षा रक्षकांनी पीडित पुरुषाला गाडीत बसवले आणि मारहाण करून मुरादनगरला नेले. मुरादनगरला त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. (Delhi Rape Case)

डेटवर नेलेल्या मुलीची भूमिका संशयास्पद (Delhi Rape Case)

पीडित पुरूषाला हॉटेल मालकाने बेशुद्धस्थेत विवेक विहार येथे सोडले. यानंतर दुपारी २ वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. २९ जुलै रोजी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पीडितेसोबत असलेल्या मुलीची भूमिकाही संशयास्पद वाटत आहे. हे शक्य आहे की मुलीनने हॉटेल मालकाशी मिळून हा सर्व प्रकार केला असावा?.पोलीस त्याची चौकशी करत असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. (Delhi Rape Case)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news