rakesh tikait : ‘शेतकर्‍यांना बळजबरीने सीमेवरून हटवाल तर सरकारी कार्यालये…’

rakesh tikait : ‘शेतकर्‍यांना बळजबरीने सीमेवरून हटवाल तर सरकारी कार्यालये…’

शेतकर्‍यांवर दबावाचा वापर करत सीमेवरून हटवण्याचा प्रयत्न केल्यास सरकारी कार्यालयांचे रूपांतर धान्याच्या बाजारात होईल असा थेट इशारा मोदी सरकारला शेतकरी नेते राकेश टिकैत (farmer leader rakesh tikait) यांनी दिला. दिल्लीतील गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून होत आहे. या कारणावरून शेतकरी नेते आणि पोलिस प्रशासन यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत यांनी हा इशारा दिला आहे. (rakesh tikait stern warning if farmers were forcibly removed from delhi borders then government offices There will be grain markets)

टिकैत पुढे म्हणाले, आंदोलक शेतकऱ्यांचे तंबू जेसीबीद्वारे हटवण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.

असे केल्यास शेतकरी पोलीस ठाण्यात तंबू ठोकल्याशिवाय राहणार नाहीत.

rakesh tikait : दिल्ली पोलिस बॅरीकेड्स हटवण्याच्या तयारीत

दिल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासून गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात केली आहे, गेली ११ महिने शेतकरी तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. हे रस्ते सुमारे ११ महिन्यांपासून बंद आहेत.

शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे, तर शेतकरी नेते आणि किसान मोर्चाने आपल्या आम्ही रस्ता अडवला नसल्याचे वारंवार सांगितले आहे. उलट पोलीस प्रशासनाने (दिल्ली पोलीस) बॅरिकेड्स लावून हे काम केले आहे.

पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश

दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांचे जवान टिकरी सीमेवरून जेसीबी मशिनद्वारे नाकाबंदी हटवताना दिसले होते. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे.

रस्ते अनिश्चित काळासाठी बंद करता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीत म्हटले आहे.

दरम्यान हा रास्ता रोको नसून शेतकऱ्यांकडून केला गेला नसून तर प्रशासनाकडून करण्यात आल्याचेही न्यायालयात समोर आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news