उत्तराखंड : खासगी बस दरीत कोसळली; एकाच गावातील १३ जणांचा मृत्यू | पुढारी

उत्तराखंड : खासगी बस दरीत कोसळली; एकाच गावातील १३ जणांचा मृत्यू

 पुढारी ऑनलाईन

उत्तराखंड राज्यातील विकासनगरमध्ये एका खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे दरीत कोसळली. त्यामध्ये १३ जणांचा मृत्यू जागीच झाला असून ५ जण गंभीर जखमी झालेले आहेत. घटनेची माहिती मिळताच चकराता एसडीएम, पोलीस, आणि एसआरडीएफची टीम घटनास्थळावर पोहोचली आहे.

दरीत अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. सर्व मृत व्यक्ती एकाच गावात राहणाऱ्या आहेत. घटनेची माहिती मिळताच उत्तराखंडाचे विरोध पक्षनेते प्रीतम सिंह घटनास्थळी गेले आहेत. बायला या गावापासून विकासनगरला जाणाऱ्या बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि हे बस दरीत कोसळली.

बस दरीत कोसळताच स्थानिकांनी प्रवाशांना दरीत काढण्याचा प्रयत्न केला. त्याच पोलीस-प्रशासनाची टीमदेखील हजर झाली. अजून प्रवाशांना दरीत बाहेर काढण्याचं बचाव कार्य सुरू आहे. अपघात स्थळ हे अत्यंत दूर्गम असून बचावकार्यासाठी वेळ लागत आहे.

उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर सिंध धामी यांनी चकरातावरील बुल्हाड-बायला मार्गावर झालेल्या या गंभीर अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी वेगाने बचाव कार्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच जखमी झालेल्यांना तातडीने उपचार देण्याचेही आदेश दिलेले आहेत. उपचारामध्ये हलगर्जीपणा झाला की, तो खपवून घेतला जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Back to top button