देशाचे सेमीकंडक्टर धोरण केवळ देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी नाही : परराष्ट्र मंत्री जयशंकर | पुढारी

देशाचे सेमीकंडक्टर धोरण केवळ देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी नाही : परराष्ट्र मंत्री जयशंकर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाचे सेमीकंडक्टर धोरण सेमीकंडक्टरच्या केवळ देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी नसून जागतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रमुख सेमीकंडक्टर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलताना केले. सेमीकंडक्टरचा विश्वासू जागतिक पुरवठादार अशी ओळख भारताला बनवायची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सेमीकंडक्टर सप्लाय चेनसाठी भारत आणि जपान यांच्यादरम्यान चालू महिन्यात करार करण्यात आला असून अशाच प्रकारचा करार मार्च महिन्यात करण्यात आला होता. जगभरातील सेमीकंडक्टर कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आमच्याकडील डेटा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असेही जयशंकर यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button