Opposition MPs’ Manipur visit : मणिपूर राज्यपालांची ‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने घेतली भेट | पुढारी

Opposition MPs’ Manipur visit : मणिपूर राज्यपालांची 'इंडिया'च्या शिष्टमंडळाने घेतली भेट

पुढारी ऑनलाईन: मणिपूरमधील हिंसाचार व महिलांवरील अत्याचार प्रकरणी विरोधी पक्ष आघाडी आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षांच्या ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (I.N.D.I.A.) आघाडीकडून लोकसभेत अविश्वास ठराव प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या ठरावाला लोकसभा अध्यक्षांनी देखील परवानगी दिली असून, लवकरच यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडीच्या काही खासदारांनी आज (दि.३० जुलै) मणिपूरला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. मणिपूर दौऱ्यावर गेलेल्या खासदारांमध्ये अविश्वास ठरावासाठी प्रस्ताव मांडलेल्यापैकी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचाही (Opposition MPs’ Manipur visit) समावेश आहे.

मणिपूर दौऱ्यादरम्यान विरोधी आघाडीच्या शिष्टमंडळाने मणिपूरच्या राज्यपाल अनुसुइया उईके यांची भेट घेतली.  शिष्टमंडळाने राज्यपालांना एक निवेदन सादर केले. या निवेदनाच्या माध्यमातून मणिपूरमधील शांतता, सुव्यवस्था आणि सलोखा पुनर्स्थापित करण्यासाठी सर्व प्रभावी उपाययोजना (Opposition MPs’ Manipur visit) कराव्यात अशी विनंती केली आहे.

मणिपूरमधील परिस्थिती अद्याप पूर्णपणे सामान्य झालेली नाही. गेल्या ८९ दिवसांपासून मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडत आहे. त्यामुळे येथील परिस्थिती पूर्ववत आणि शांतता प्रस्तापित करण्यासाठी केंद्राला हस्तक्षेप करण्याची माहिती द्यावी, असे देखील या निवेदनात (Opposition MPs’ Manipur visit ) म्हटले आहे.

मणिपूरमधील परिस्थिती पूर्ववत न झाल्यास किंवा येथील वांशिक संघर्षाची समस्या लवकर सुटली नाही, तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता देखील राज्यपालांशी झालेल्या भेटीदरम्यान I.N.D.I.A आघाडीच्या शिष्टमंडळाकडून ( व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button