Bhima Koregaon case:भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वर्नोन गोन्साल्विस, अरुण फेरेरिया यांना जामीन

भीमा कोरेगाव
भीमा कोरेगाव

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वर्नोन गोन्साल्विस आणि अरुण फेरेरिया यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. माओवाद्यांसोबत संबंध असल्याचा आरोप करीत पोलिसांनी त्यांना पाच वर्षांपूर्वी अटक केली होती. दोन्ही आरोपींविरोधात गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याची [युएपीए] कलमे (Bhima Koregaon case) लावण्यात आलेली आहेत.

केवळ एकच मोबाईल वापरावा, त्यातही लोकेशन सुरु ठेवावे आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडून इतरत्र कुठेही जाऊ नये, आदी अटी घालत न्यायमूर्ती अनिरुध्द बोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने गोन्साल्विस व फेरेरिया यांना जामीन दिला. वरील दोघांनी आपला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा, असे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने गोन्साल्विस व फेरेरिया यांना जामीन देण्यास नकार दिला होता, त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव (Bhima Koregaon case) घेतली होती.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news