अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधातील लूकआउट सर्क्युलर सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द | पुढारी

अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधातील लूकआउट सर्क्युलर सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : तृणमूल कॉग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजिरा यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले लुकआउट सर्क्युलर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. प. बंगालमधील कोळसा तस्करी प्रकरणातील पैसा हवाला मार्गाने बॅनर्जी यांना प्राप्त झाला असल्याचा तपास संस्थांचा आरोप आहे.

बॅनर्जी दांपत्याविरोधात लुकआउट सर्क्युलर काढल्याबद्दल गत सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाविरोधात कोरडे ओढले होते. तपास संस्थेला एका आठवडा आधी कळवून बॅनर्जी दांपत्य विदेशात जाऊ शकतात, असे न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी स्पष्ट केले.

हेही वाचा;

Back to top button