Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टीची सपाट ओपनिंग, 'या' स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी | पुढारी

Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टीची सपाट ओपनिंग, 'या' स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी

पुढारी ऑनलाईन : संमिश्र जागतिक संकेत आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या उद्या जाहीर होणाऱ्या पतधोरण निर्णयापूर्वी आज मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने सावध सुरुवात केली. सेन्सेक्सने ७५ अंकांनी वाढून ६६,४६० वर सुरुवात केली होती. पण काही वेळातच तो सपाट झाला. निफ्टी १९,६६८ वर व्यवहार करत आहे. बँकिंग, ऑटो आणि फायनान्सियल स्टॉक्स अॅक्शनमध्ये दिसत आहेत. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एम अँड एम, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्स वधारले आहेत. तर आयटीसी, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, एलटी, ॲक्सिस बँक बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स घसरले आहेत.

TVS मोटर कंपनीचे शेअर्स (Shares of TVS Motor Company) आज ३ टक्के वाढून उघडले. टीव्हीएस मोटर फर्मचा वार्षिक नफा ४६ टक्के वाढून ४६८ कोटी रुपयांवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर TVS मोटरचे शेअर्स वधारले. (Stock Market Updates)

जागतिक बाजार

दरम्यान, आशियाई बाजारात तेजीचे वातावरण आहे. तर अमेरिकेतील शेअर बाजारातील निर्देशांक काल सोमवारी वाढून बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज १५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. नॅस्डॅक कंपोझिट देखील वधारला.

परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीवर जोर

तात्पुरत्या NSE डेटानुसार, गेल्या काही दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात ओघ वाढला होता. पण परदेशी संस्थागत गुंतवणूकदार सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात निव्वळ विक्रेते राहिले. त्यांनी ८२.९६ कोटी रुपये भारतीय शेअर्स ऑफलोड केले, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी ९३५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

Back to top button