Little Boy Fell into Borewell : बिहार, 3 वर्षांचा चिमुकला 40 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला; बचावकार्य सुरू | पुढारी

Little Boy Fell into Borewell : बिहार, 3 वर्षांचा चिमुकला 40 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला; बचावकार्य सुरू

पुढारी ऑनलाइन डेस्क : Little Boy Fell into Borewell : बिहारच्या नालंदा येथील कुल गावात आज रविवारी सकाळी एक तीन वर्षांचा चिमुकला 40 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. माहिती मिळताच एनडीआरएफ आणि इतर बचाव पथकांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. शिवम असे या चिमुकल्याचे नाव आहे. शिवमला वाचवण्यासाठी बचाव पथकांचे प्रयत्न सुरू आहेत.

एएनआयच्या हवाल्याने इंडिया टुडे ने याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एका पोलिस अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, एक मूल बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही बाळाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफ आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचणार आहे. मूल अजूनही जिवंत आहे, आम्हाला त्याचा आवाज ऐकू येत आहे,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले.

Bihar Shivam Fell down into Boarwell
Bihar Shivam Fell down into Borewell

Little Boy Fell into Borewell : शिवमचा पाय घसरला अन् तो बोअरवेलमध्ये पडला

घटनेविषयी शिवमच्या आईने सांगितले की, ती शेतात काम करत होती आणि शिवम हा तिथेच जवळपास खेळत असताना त्याचा अचानाक पाय घसरला आणि तो बोअरवेलच्या आत पडला. मुलाला ऑक्सिजन पोहोचवण्यसााठी आणि बोअरवेलमधून मुलाला बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन मागवण्यात आल्या आहेत.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाळाला त्वरित वैद्यकीय मदत देण्यासाठी ऑक्सिजन सुविधांनी सुसज्ज वैद्यकीय पथके देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच घटनास्थळी नाकेबंदी करण्यात आली आहे. जेणेकरून बचाव कार्याची सुरक्षितता आणि कार्यक्षमता अधिक वाढेल.

Little Boy Fell into Borewell : बोअरवेल बंद न केल्याने दुर्घटना

एनआयच्या माहितीनुसार, परिसरातील एका शेतकऱ्याने बोरिंगसाठी इथे बोअरवेल खोदले होते. मात्र, इथे पाणी लागले नाही. त्यामुळे अन्यत्र बोअरवेल खोदण्याचा त्याने निर्णय घेतला. मात्र या ठिकाणी खोदलेली बोअरवेल बंद करण्यात आली नव्हती. परिणामी खेळत असताना ही घटना घडली. शिवमसोबत खेळणाऱ्या अन्य मुलांनी ही माहिती जवळच शेतात काम करणाऱ्या त्याच्या आई-बाबांना दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने धावपळ करत घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आणि पोलिसांना याबाबत कळवले, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच मुलाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

अलीकडील काळात मध्य प्रदेशात विदिशा आणि सिहोर येथील घटनांमध्ये बोअरवेलमध्ये पडून श्वास गुदमरल्याने चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा :

Gondia News : गोंदियात १० कोटींची राेकड, २ किलो सोने जप्त

Irshalgad landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी शोधकार्य सुरूच

Back to top button