Heavy Rain in Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्‍कळीत

Heavy Rain in Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्‍कळीत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे चिनाब नदी क्षेत्रातील काही घरे जमीनदोस्त झाली आहेत. याचा परिणाम राज्‍यातील वाहतूक, वीज आणि पाणी पुरवठ्यावरपरिणाम झाला आहे. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीसोबत काही ठिकाणी थोड्या प्रमाणात पाऊसही झाला. दरम्यान, मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा काही काळासाठी स्‍थगित करण्‍यात आली आहे.  (Heavy Rain in Jammu Kashmir)

शनिवारी तीन हजारांहून अधिक प्रवाशांचा एक गट जम्मूहून काश्मीरला रवाना झाला. जम्मू-श्रीनगर महामार्गावर दोन ठिकाणी भूस्खलनामुळे ताफा रामबन येथे थांबला होता. रामबन जिल्ह्यातील मेहर आणि दलवास भागात भूस्खलनामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमरनाथ यात्रेकरूंची ३४७२ जणांची तुकडी पहाटे १३२ वाहनांतून जम्मूतील भगवती नगर बेस कॅम्पहून निघाली. महामार्ग बंद झाल्यामुळे हा ताफा चंद्रकोट येथे थांबला होता. महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर त्यांना पुढे पाठवण्यात आले.

हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि वादळाची नोंद झाली आहे. कठुआ जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. (Heavy Rain in Jammu Kashmir)

सकाळी चिनाब नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अखनूरच्या गडखलमधील गुज्जरांची वस्ती पाण्याखाली गेली. दरम्यान, डोडा जिल्ह्यात कोटा नाल्यात ढगफुटीमुळे थलिला-चिराळा लिंक रोडचा काही भाग वाहून गेला. या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. थाथरी उपविभागीय दंडाधिकारी अथर अमीन जरगर यांनी सांगितले की, मुसळधार पावसासह ढगफुटीमुळे कोटा नाल्यात भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यात कोणाची जीवितहानी किंवा जखमी झाल्याची कोणतीही माहिती नाही. रस्त्यावरील ढिगारा हटवून लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात येत आहे. (Heavy Rain in Jammu Kashmir)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news