US Navy Chief : अमेरिकन नौदलाची कमान प्रथमच महिलेच्या हाती; राष्ट्राध्यक्ष बायडेनकडून फ्रँचेट्टी यांची निवड | पुढारी

US Navy Chief : अमेरिकन नौदलाची कमान प्रथमच महिलेच्या हाती; राष्ट्राध्यक्ष बायडेनकडून फ्रँचेट्टी यांची निवड

पुढारी ऑनलाइन डेस्क : US Navy Chief : अमेरिकच्या इतिहासात पहिल्यांदाच नौदलाची कमान एका महिलेच्या हाती सोपविण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन नौदलाच्या प्रमुख म्हणून अॅडमिरल लिजा फ्रँचेट्टी (Adm. Lisa Franchetti) यांची निवड केली आहे. मात्र, यावर अद्याप यूएस सिनेटकडून त्यांच्या नियुक्तीला मान्यता मिळावयाची आहे. सिनेटने मान्यता दिल्यास लिसा या यूएसमधील कोणत्याही लष्करी सेवेच्या प्रमुख म्हणून त्या पहिल्या महिला असतील.

लिजा फ्रँचेट्टी या सध्या नौदलाच्या उपप्रमुख आहेत. 1985 मध्ये त्या नौदलात रूजू झाल्या होत्या. त्यांनी यूएस नेव्हीमध्ये कमांडर कोरिया, नेव्हल ऑपरेशन्स फॉर वॉरचे उपप्रमुख आणि रणनिती योजना आणि धोरण संचालक म्हणून काम केले आहे. तसेच दोन कॅरियर स्ट्राइक गटांचे नेतृत्व देखील केले आहे आणि सप्टेंबर 2022 मध्ये नौदल कर्मचारी उपप्रमुख बनले आहेत. US Navy Chief

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी शुक्रवारी लिजा फ्रँचेट्टी यांच्या नावाची घोषणा केली. ते म्हणाले, आमचे पुढचे नौदल प्रमुख म्हणून, अॅडमिरल लिसा फ्रँचेट्टी या नौदल ऑपरेशन्सचे उपप्रमुख म्हणून सध्याच्या भूमिकेसह, एक कमिशन्ड अधिकारी म्हणून आमच्या राष्ट्रासाठी 38 वर्षांची समर्पित सेवा देतील. ते पुढे म्हणाले, की त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी ऑपरेशनल आणि पॉलिसी या दोन्ही क्षेत्रांमध्ये व्यापक कौशल्य प्रदर्शित केले आहे. यूएस नेव्हीमध्ये फोर-स्टार अॅडमिरलची रँक प्राप्त करणारी ती दुसरी महिला आहे आणि जेव्हा त्यांची पुष्टी होईल तेव्हा नौदल प्रमुख आणि जॉइंट चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम करणारी पहिली महिला म्हणून पुन्हा इतिहास घडवेल.

याशिवाय बायडेन यांनी अन्य नियुक्त्यांची देखील घोषणा केली आहे. यामध्ये यूएस नेव्हीच्या पॅसिफिक फ्लीटचे कमांडर, यूएस फ्लीट फोर्सेस कमांडचे डेप्युटी कमांडर व्हाईस अॅडमिरल जेम्स किल्बी, इंडो-पॅसिफिक कमांडचे कमांडर म्हणून नियुक्त करत आहेत. बिडेन यांनी व्हाईस अॅडमिरल स्टीफन वेब कोहेलर यांना अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटचे कमांडर म्हणून पापारोआच्या जागी नियुक्त केले. माध्यमांच्या माहितीनुसार यूएस संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी या नियुक्त्तयांचे कौतुक केले आहे. US Navy Chief

हे ही वाचा : 

Back to top button