Pm Modi America Visit : अमेरिकेच्या आकाशात झळकला PM मोदींचा बॅनर | पुढारी

Pm Modi America Visit : अमेरिकेच्या आकाशात झळकला PM मोदींचा बॅनर

पुढारी ऑनलाइन डेस्क : Pm Modi America Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते अमेरिकेत पोहोचले. सध्या ते न्यूयॉर्कला आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला पोहोचताच त्यांचे तिथे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. यावेळी फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने पीएम मोदी यांचा बॅनर दिमाखात आकाशात झळकवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी पाच वाजता युएन हेडक्वॉर्टस् येथील योग कार्यक्रमात सहभाग घेतील. यानिमित्त फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने यूएसच्या या ऐतिहासिक यात्रेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतार्थ न्यूयॉर्कच्या हडसन नदीवर मोदींचा बॅनर आकाशात झळकवला. हा बॅनर 250 फूट लांब आहे. या बॅनरवर पीएम मोदींची प्रतिमा आहे. त्यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचीही प्रतिमा या बॅनरवर आहे.

Pm Modi America Visit : एलॉन मस्क म्हणाले ‘मी मोदींचा फॅन’

अमेरिकेच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यात अनेक नागरिक, थिंक टँक, शिक्षणतज्ज्ञ, आईटी आणि टेक स्पेस क्षेत्रातील दिग्गजांची भेट घेणार आहेत. दरम्यान त्यांची एलॉन मस्क सोबतची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. मोदींच्या भेटीनंतर एलॉन मस्क यांनी मी मोदींचा फॅन आहे, असे म्हटले आहे. त्यांनी सस्टेनबल एनर्जीसह अन्य अनेक प्रमुख मुद्द्यांवर मोदींसह चर्चा केली आहे. Pm Modi America Visit

हे ही वाचा :

International Yoga Day – बेली फॅट घालवण्यासाठी सर्वात सोपी ४ योगासने

Modi visit Musk : ‘मी मोदींचा फॅन’ अमेरिका भेटीत एलॉन मस्क यांनी केली मोदींची स्तुती म्हणाले…

Elon Musk: एलन मस्क भारत दौऱ्यावर येणार; गुंतवणुकीबाबत उत्सुक

Back to top button