क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो म्हणजे काय? जाणून घ्या अधिक | पुढारी

क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो म्हणजे काय? जाणून घ्या अधिक

- सुभाष वैद्य

क्रेडिट कार्डच्या क्रेडिट युटिलायझेशन रेश्योला कशा प्रकारे तयार केले जाते, हे समजून घेऊ आणि ते नियंत्रणात ठेवणे का गरजेचे आहे, ते जाणून घेऊ.

क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो म्हणजे काय?

‘क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो’ला ‘लोन क्रेडिट रेश्यो’ म्हणूनही ओळखले जाते. आपल्याकडील उपलब्ध असलेल्या एकूण क्रेडिटच्या तुलनेत सद्य:स्थितीत वापरण्यात येणार्‍या क्रेडिटच्या क्वाटिंटीचे हे प्रमाण आहे. यास टक्केवारीतून समजून घेता येईल. आकडेमोडीतून क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो समूजन घ्यायचा असेल, तर एकूण क्रेडिट कार्ड बॅलेन्सला क्रेडिट कार्डच्या एकूण मर्यादेतून डिव्हाईड करणे.
क्रेडिट युटिलायजेशन रेश्योला कॅलकुलेट करण्यासाठी पुढील टप्पे करा.

* क्रेडिट कार्डचे विवरण गोळा करा. * सर्व क्रेडिट कार्डचे ताजे विवरण गोळा करा. * क्रेडिट कार्डची एकूण बॅलेन्स रक्कम निश्चित करा.

* सर्व क्रेडिट कार्डवरची थकबाकी शिल्लक रकमेला जोडा. * स्वत:ची एकूण क्रेडिट लिमिट निश्चित करा. * सर्व क्रेडिट कार्डवरची क्रेडिट लिमिट जोडा. * क्रेडिट युटिलायझेशन रेश्योला कॅलकुलेट करा.

एकूण क्रेडिट कार्ड बॅलेन्सला एकूण क्रेडिट लिमिटमधून डिव्हाईड करा आणि टक्केवारी मिळवण्यासाठी शंभरने गुणावे. उदा. आपल्या क्रेडिट कार्डमध्ये 20 हजारांची शिल्लक असेल आणि एकूण क्रेडिट लिमिट 10 हजार रुपये असेल तर आपला क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो (20000/10000) गुणिले 100 = 20 टक्के असेल.
क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो कशासाठी महत्त्वाचा

क्रेडिट स्कोरवर परिणाम : क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो हा आपला क्रेडिट स्कोर निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. क्रेडिट स्कोरिंग मॉडेल ऊर्फ क्रेडिट युटिलायझेशन रेश्योकडे एक जबाबदार क्रेडिट मॅनेजमेंट म्हणून ओळखले जातेे. चांगला क्रेडिट स्कोर ठेवण्यासाठी साधारपणे क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो हा 30 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

कर्जदात्यांसाठी महत्त्वाचा : कर्ज देण्याचा निर्णय घेताना कर्जदाते हे युटिलायजेशन रेश्योचे आकलन करतात. उच्च युटिलायझेशन रेश्यो हा उच्च जोखमीचे संकेत देतात. नव्याने कर्ज घेणे किंवा नवीन क्रेडिट कार्ड मंजुरीच्या शक्यतेवर नकारात्मक परिणाम राहू शकतो.

कर्ज व्यवस्थापन : क्रेडिट युटिलायझेशन रेश्योवर देखरेख ठेवल्यास आपल्याला कर्ज घेण्यासाठी मदत मिळते. उच्च रेश्यो असेल तर संभाव्य आर्थिक अडचणीचे संकेत मिळू शकतात. मात्र त्यास नियंत्रणात ठेवत आपण पुरेसे कर्ज घेण्यास पात्र राहू शकता.

फायनान्शियल फ्लेक्झिबिलीटी : कमी क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो हे आपल्याला फायनान्शियल फ्लेक्झिबिलिटी प्रदान करतोे. आपल्याला भविष्यात चांगली खरेदी करायची असेल किंवा आपत्कालीन स्थितीत जादा कर्ज गरजेचे असेल आणि कमी रेश्यो राहिल्यास काही अटींसह कर्ज मिळणे सहज शक्य आहे.

क्रेडिट युटिलायझेशन रेश्योला मॅनेज करताना…

नियमित तपासणी : क्रेडिट युटिलायझेशन रेश्योला चांगल्या मर्यादेत ठेवण्यासाठी खर्च करताना पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या क्रेडिट कार्डची शिल्लक रक्कम आणि क्रेडिट लिमिटवर लक्ष असणे गरजेचे आहे.

शिल्लक रकमेचे पूर्ण पेमेंट करा : आपल्या क्रेडिट युटिलायझेशन रेश्योला कमी ठेण्यासाठी थकबाकी ठेवू नका. दरमहा क्रेडिट कार्डवरील शिल्लक रकमेचे पूर्ण पेमेंट करण्याबाबत सजग राहावे.

क्रेडिट लिमिट वाढवा : क्रेडिट कार्ड प्रदान करणार्‍या कंपनी, बँकांना आपली क्रेडिट लिमिट वाढविण्याची विनंती करू शकता. बँकही क्रेडिट हिस्ट्री पाहून मर्यादा वाढवू शकते. यानुसार क्रेडिट युटिलायझेशन रेश्योला कमी करण्यासाठी मदत करू शकते. मात्र अधिक खर्चापासून सावध राहा.

वेगवेगळ्या क्रेडिट कार्डपासून सावध राहा : गरज भासल्यास प्रत्येक कार्डवर कमी शिलकी रक्कम आणि कमी युटिलायझेशन रेश्यो ठेवण्यासाठी खर्चांना विविध क्रेडिट कार्डांत विभागणी करा. एकुणातच क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो चांगला राहणे हे ‘फायनान्शियल वेल्फेअर’साठी महत्त्वाचे आहे.

 

Back to top button