YSR काँग्रेसच्या खासदाराच्या मुलाला दिल्ली हाय कोर्टाकडून जामीन | पुढारी

YSR काँग्रेसच्या खासदाराच्या मुलाला दिल्ली हाय कोर्टाकडून जामीन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे खासदार एम. श्रीनिवासुलू रेड्डी यांचे पुत्र राघव मंगुटा यांचा जामीनअर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला. हवाला प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या मंगुटा यांना वैद्यकीय आधारावर जामीन देण्यात आला आहे.

ईडीचे अधिकारी जेव्हा दिल्ली किंवा चेन्नईतील कार्यालयात बोलावतील, तेव्हा हजर रहावे, अशी अट घालत न्यायमूर्ती दिनेशकुमार शर्मा यांनी मंगुटा यांना जामीन दिला. जामिनावर असतानाच्या काळात चेन्नईमध्ये रहावे व दररोज सायंकाळी चार वाजता ईडी कार्यालयात हजेरी लावावी, असे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले. दिल्लीतील अबकारी कर घोटाळ्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा तपास संस्थांचा आरोप आहे. यासंदर्भात हवालाच्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे. मंगुटा हे त्या हवाला प्रकरणात आरोपी आहेत.

हेही वाचा : 

Back to top button