E-Cigarettes : ई सिगारेट विकणाऱ्या १५ वेबसाईटसना आरोग्य मंत्रालयाची नोटीस | पुढारी

E-Cigarettes : ई सिगारेट विकणाऱ्या १५ वेबसाईटसना आरोग्य मंत्रालयाची नोटीस

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बंदी असतानादेखील देशात ई सिगारेटची विक्री करणाऱ्या १५ वेबसाईटसना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोटीस पाठविली आहे. ई सिगारेटची जाहिरात करण्याबरोबरच त्याची विक्री तात्काळ बंद करावी, असे या नोटीशीत म्हटले आहे. दरम्यान सोशल मीडियावर ई सिगारेटची जाहिरात केली जात आहे का, यावरही आरोग्य मंत्रालयाची करडी नजर आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नोटिशीनंतर १५ पैकी चार वेबसाईटसनी ई सिगारेटची विक्री बंद केली आहे, तर ११ वेबसाईटसनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. ज्या वेबसाईटसनी उत्तर दिले नाही. तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विचारणा इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे केली जाऊ शकते. सहा अन्य वेबसाईटकडून ई सिगारेटची विक्री केली जात असल्याचा संशय असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. ई सिगारेटवर बंदी घालण्याबाबतचा कायदा केंद्र सरकारने २०१९ साली केला होता.

हेही वाचा : 

Back to top button