Fuel price : सलग तिसर्‍या दिवशी इंधन दरात वाढ

Fuel price : सलग तिसर्‍या दिवशी इंधन दरात वाढ
Published on
Updated on

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे प्रति बॅरलचे दर 84 डॉलर्सच्या आसपास स्थिर असूनही सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी सलग तिसर्‍या दिवशी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली.

दोन्ही इंधनाचे दर प्रत्येकी 35 पैशांनी वाढविण्यात आले आहेत. विमानाच्या इंधन दराच्या तुलनेत आता पेट्रोलचे दर 37.52 टक्क्यांनी जास्त झाले आहेत. इंधन दराच्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे दैनिक बजेट मात्र कोलमडून गेल्याचे चित्र आहे.

इंधनाच्या ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 108.64 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 97.37 रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये हेच दर क्रमशः 114.47 आणि 105.49 रुपयांवर गेले आहेत. तामिळनाडूतील चेन्नई येथे पेट्रोल 105.43 रुपयांवर तर डिझेल 101.59 रुपयांवर गेले आहे. प. बंगालमधील कोलकाता येथे हेच दर 109.12 आणि 100.49 रुपयांवर गेले आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news