Supreme Court : स्थानिक स्वराज संस्था निवडणूक, ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा टळली | पुढारी

Supreme Court : स्थानिक स्वराज संस्था निवडणूक, ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा टळली

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तसेच ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा टळली आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी  मंगळवारी 18 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातील याचिका प्रलंबित आहेत.

मागील कित्येक महिन्यांपासून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा निघू शकलेला नाही. सुमारे वर्षभरापासून या खटल्यांवर सुनावणीच झालेली नाही. त्यामुळे निवडणुका लांबलेल्या आहेत. ही याचिका निकाली लागली तर 23 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 207 नगरपालिका व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय 92 नगर परिषदांच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button