Chandrayaan-3 : ‘चांद्रयान-३’ चा पहिला टप्पा यशस्वी; पीएम मोदी म्हणाले, ‘भारताने अंतराळ यात्रेत… | पुढारी

Chandrayaan-3 : 'चांद्रयान-३' चा पहिला टप्पा यशस्वी; पीएम मोदी म्हणाले, 'भारताने अंतराळ यात्रेत...

पुढारी ऑनलाईन : भारतातील श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-३ मोहिमेचे आज (दि.१४ जुलै) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भारताने अंतराळ यात्रेत एक नवीन अध्याय रचेल असे म्हणत, या मोहिमेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी (Chandrayaan-3) ट्विटरवरून ही प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटमध्ये पीएम मोदी यांनी म्हटले आहे की, चांद्रयान-3 भारताच्या अंतराळ ओडिसीमध्ये एक नवीन अध्याय लिहित आहे. चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत आणि उंच भरारी घेत आहे. चांद्रयान-३ ची ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे, असे म्हणत या मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या जिद्द आणि चातुर्याला माझा सलाम! (Chandrayaan-3) असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे.

Chandrayaan-3: भारत अंतराळ ओडिसी लिहिण्याच्या मार्गावर… गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले की, “भारताने आज चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणासह ऐतिहासिक अंतराळ प्रवासाला सुरुवात केली आहे. इस्रोच्या त्या शास्त्रज्ञांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, ज्यांच्या अथक परिश्रमाने आज भारताला पिढ्यानपिढ्या एक उल्लेखनीय अवकाश ओडिसी लिहिण्याच्या मार्गावर (Chandrayaan-3) नेऊन ठेवले आहे.

हेही वाचा:

Back to top button