Tomato prices are low : ‘या’ राज्यांमध्ये नागरिकांना दिलासा! ९० रुपये किलो दराने होणार टोमॅटोची विक्री | पुढारी

Tomato prices are low : 'या' राज्यांमध्ये नागरिकांना दिलासा! ९० रुपये किलो दराने होणार टोमॅटोची विक्री

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीमध्ये टोमॅटोच्या (Tomato) दराने दीडशे रुपयांचा आकडा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सहकारी ग्राहक फेडरेशनने (NCCF) मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून महानगरात 90 रुपये प्रती किलो या दराने टोमॅटोची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दिल्लीसह अन्य काही राज्यामधील शहरात नागरिकांना टोमॅटो कमी भावाने उपलब्ध होणार आहे.  (Prices are low)
टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीमुळे नागरिक हैराण झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एनसीसीएफ कडून सांगण्यात आले. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नोएडा येथे रजनीगंधा चौकात, तर ग्रेटर नोएडा येथे मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून टोमॅटोची विक्री केली जाईल. एनसीसीएफ कडून  अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातील लखनौ, कानपूर आणि राजस्थानमधील जयपूर येथेही टोमॅटोची विक्री केली जाणार आहे.  (Tomato prices are low)
हेही वाचा

Back to top button