Chandrayaan-3 बद्दल ‘या’ १० गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात | पुढारी

Chandrayaan-3 बद्दल 'या' १० गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क : ISRO आज चंद्रयान-3 मिशन लॉन्च करत आहे. चांद्रयान-३ श्रीहरिकोटामधून लॉन्च केलं जाईल. या चांद्रमोहिमेची पूर्ण तयारी झालीय. आज १४ जुलै रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान प्रक्षेपित होईल. (Chandrayaan-3) चांद्रयान-३ चंद्रावर पाठवणारा भारत जगातील चौथा देश असेल. (Chandrayaan-3)

चांद्रयान-3 मोहिमेची महत्त्वाची माहिती…

१) चांद्रयान-३च्या प्रक्षेपणाआधी लँडर विक्रमला जीएसएलवी मार्क ३ हेवी लिफ्ट लॉन्च व्हेहिकल ज्याला बाहुबली रॉकेट म्हटलं जातं, त्यावर ठेवले जाईल. त्यास लॉन्च व्हीकल मार्क ३ (एलएम-३) नाव देण्यात आले आहे. जीएसएलव्ही ४३.५ मीटर उंच आहे. म्हणजेच याची उंची दिल्लीतील कुतुबमीनारहून अधिक आहे. चांद्रयान-३ प्रक्षेपित केल्यानंतर ४० दिवसांनंतर म्हणजेच २५ ऑगस्टला चंद्रावर उतरेल.

२) २०१९ मध्ये तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयान-२ चंद्रावर उतरू शकले नाही. परंतु, यंदा ISRO ला चांद्रयान-३ यशस्वी होईल, असा विश्वास आहे.

३) ISRO चे माजी प्रमुख सिवन म्हणाले की, आम्हाला ही गोष्ट समजलीय की, मागील मोहिमेत काय अडचणी आल्या होत्या. आम्ही यावेळी कोणत्याही प्रकारची अडचण ठेवलेली नाही. आशा आहे की, आम्ही वेळेवर चांद्रयान-३ ला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यास नक्कीच यशस्वी होऊ.

४) पहिल्यांदा भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. जिथे पाण्याचे अंश आढळले आहेत. २००८ मध्ये भारताच्या पहिल्या चांद्र मोहिमेच्या दौऱ्यान हा शोध जगाला आचंबित करणारा होता.

५) विक्रमचा उद्देश सुरक्षित, सॉफ्ट लँडिंग करणे आहे. त्यानंतर लँडर रोवर व्हेइकल सोडेल, जे एक एक लूनर डे (पृथ्वीच्या १४ दिवसांइतके) पर्यंत चंद्रावर फिरेल आणि वैज्ञानिक प्रयोगदेखील करेल.

६) या मिशन अंतर्गत वैज्ञानिकांना चंद्रमाच्या मातीचे विश्लेषण करणे, चंद्राच्या पृष्ठभागावर चारीकडे पिरणे आणि चंद्राशी संबंधित काही महत्त्वाची माहिती गोळा करणे उद्देश आहे.

७) ISRO चे म्हणणे आहे की, मागील चांद्रयान मिशनच्या दरम्यान झालेल्या चुका सुधारत आम्ही लँडरवर इंजिनची संख्या पाच न ठेवता चार ठेवली आहे आणि सॉफ्टवेअरदेखील अपडेट केलं आहे. प्रत्येक गोष्टीचे योग्य परीक्षण करण्यात आले आहे.

८) ISRO चे माजी प्रमुख सिवन म्हणाले की, यावेळी आम्हाला आशा आहे की, चांद्रयान-२ मधील छोटे-मोठे अनेक अभाव दूर करण्यात आले आहेत. म्हणून आम्हाला विश्वास आहे की, यावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरू.

९) चांद्रयान-१, चंद्रासाठीचे भारताचे पहिले मिशन होते, जे ऑक्टोबर, २००८ मध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. ते ऑगस्ट २००९ पर्यंत सुरु होते.

१०) तर २०१९ मध्ये चांद्रयान -२ चे लँडर नियोजित प्रक्षेपवक्रहून भटकले आणि त्यास हार्ड लँडिंगचा सामना करावा लागला. ऑर्बिटर आतादेखील चंद्राभोवती फिरत आहे आणि डेटा पाठवत आहे.

Back to top button