Stock Market Opening Bell | सेन्सेक्स, निफ्टीची तेजी कायम, IT स्टॉक्स फोकसमध्ये! | पुढारी

Stock Market Opening Bell | सेन्सेक्स, निफ्टीची तेजी कायम, IT स्टॉक्स फोकसमध्ये!

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात तेजी कायम आहे. आज शुक्रवारी सेन्सेक्स (Sensex) सुरुवातीला सुमारे ३०० अंकांनी वाढून ६५,८५६ वर खुला झाला. तर निफ्टी (Nifty) १९,५०० जवळ आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी स्टॉक्स फोकसमध्ये दिसत आहेत. (Stock Market Opening Bell)

निफ्टीवर इन्फोसिस, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, विप्रो आणि हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स वधारले, तर पॉवर ग्रिड कॉर्प, एम अँड एम, इंडसइंड बँक, बीपीसीएल आणि भारती एअरटेल हे घसरले.

सेन्सेक्स काल ६६ हजारांवर जाऊन ६५,५५८ वर स्थिरावला होता. आज तो ६५,७७५ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ६५,९१७ अंकांपर्यंत वाढ नोंदवली. सेन्सेक्सवर इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एसबीआय, टाटा स्टील, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स हे शेअर्स वाढले आहेत. तर पॉवर ग्रिड, एम अँड एम, एनटीपीसी, सन फार्मा हे शेअर्स घसरले आहेत.

अमेरिकेतील शेअर बाजारात गुरुवारीही तेजी राहिली. नॅस्डॅक (Nasdaq) निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी १ टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. अमेरिकेतील महागाईत जवळपास तीन वर्षांनी घट झाली आहे. (Stock Market Opening Bell)

हे ही वाचा :

 

Back to top button