RBI कडून २ बँकांचा परवाना रद्द, एक महाराष्ट्रातील, ठेवीदारांच्या पैशांचे काय होणार? | पुढारी

RBI कडून २ बँकांचा परवाना रद्द, एक महाराष्ट्रातील, ठेवीदारांच्या पैशांचे काय होणार?

पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मंगळवारी दोन सहकारी बँकांचा परवाना रद्द केला आहे. यात कर्नाटकातील तुमकूर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक (Sri Sharada Mahila Co-operative Bank, Tumkur, Karnataka) आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचा (Harihareshwar Sahakari Bank, Wai, Satara) समावेश आहे. या बँकांकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याने त्यांचा परवाना रद्द केल्याचे आरबीआयने म्हटले आहे. वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेने ११ जुलै २०२३ पासून बँकिंग व्यवसाय करणे बंद केले आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने निवेदनात नमूद केले आहे.

हरिहरेश्वर सहकारी बँकेचे सुमारे ९९.९६ टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून मिळण्यास पात्र आहेत. तर श्री शारदा महिला सहकारी बँकेच्या बाबतीत सुमारे ९७.८२ टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळवण्यास पात्र आहेत. लिक्विडेशननंतर प्रत्येक ठेवीदार त्यांच्या ठेवींची ५ लाखांपर्यंतची ठेव विमा दाव्याची रक्कम DICGC कडून मिळवण्यास पात्र असतील.

या बँकांचे परवाने रद्द केल्यामुळे या बँकांना ‘बँकिंग’चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे; ज्यात ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे यासह इतर गोष्टींचा समावेश आहे.

तसेच सध्याची आर्थिक स्थिती पाहाता या बँका त्यांच्या सध्याच्या ठेवीदारांना संपूर्ण पैसे देऊ शकणार नाहीत, असेही आरबीआयने (RBI) नमूद केले आहे. ८ मार्च २०२३ पर्यंत DICGC ने बँकेच्या एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी ५७.२४ कोटी रुपये आधीच दिली आहे. १२ जून २०१३ पर्यंत, DICGC ने श्री शारदा महिला सहकारी बँकेच्या ठेवीदारांना एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी १५.०६ कोटी रुपये आधीच दिले आहेत.

सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांनादेखील सदर बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे, असे आरबीआयने पुढे नमूद केले आहे.

हे ही वाचा :

Back to top button