बंगळुरु हादरले! तलवारीने कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचा खून; माजी कर्मचाऱ्याचे कृत्य

बंगळुरु हादरले! तलवारीने कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचा खून; माजी कर्मचाऱ्याचे कृत्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकची राजधानी आणि आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेले बंगळुरू आज (दि. ११) एका मोठ्या घटनेने हादरले. एका कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचा निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या कार्यालयात घुसुन माजी कर्मचाऱ्याने तलवारीने हल्ला केला. यामध्ये कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ वेणू कुमार यांचा खून करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Bengaluru Murder)

उत्तर पूर्व, बंगळुरूचे डीसीपी लक्ष्मी प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका माजी कर्मचाऱ्याने अॅरोनिक्स इंटरनेट कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचा खून  केला. मंगळवारी (दि. ११) ६ नंबरचा क्रॉस मार्ग, पंपा एक्स्टेंशन अमृतहल्ली, बेंगळुरू येथे ही घटना घडली. तलवारीने सपासप वार करत दोन्ही अधिकाऱ्यांचा खून करुन आरोपी फरार झाला आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. (Bengaluru Murder)

माजी कर्मचाऱ्याने का केला कंपनी मालकाचा खून? Why did the ex-employee kill the company MD and CEO?

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपीचे नाव फेलिक्स असे आहे. हा आरोपी पूर्वी खून झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या अॅरोनिक्स इंटरनेट कंपनीमध्ये काम करत होता. आरोपीने ही नोकरी सोडून टेक्नॉलॉजी क्षेत्राशी संबंधित स्वतःची कंपनी सुरू केली. मात्र, आरोपीच्या व्यवसायात अॅरोनिक्स इंटरनेट कंपनीचे एमडी फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ वेणू कुमार हे दोन्ही अधिकारी अडथळा आणत होते. त्यांच्या त्रासाला फेलिक्स कंटाळून गेला होता. त्याला दोन्ही अधिकाऱ्यांचा राग येत होता. दरम्यान, रागाच्या भरात फेलिक्स मंगळवारी (दि. ११) तलवारी घेऊन कंपनीच्या कार्यालयात घुसला. कंपनीत घुसुन एमडी फणींद्र आणि सीईओ वीणू यांच्यावर जीवघेणा हल्ला करून तेथून पळ काढला. या हल्ल्यात दोन्ही अधिकारी गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही अधिकाऱ्यांना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला | Bengaluru Murder

आरोपी हा फेलिक्स एरोनिक्स इंटरनेट कंपनीचा माजी कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या माजी बॉसवर खुनी हल्ला केल्यानंतर, त्याने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

कंपनीचा परिसर हादरला

अॅरोनिक्स कंपनीच्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या खूनानंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आरोपीने रागाच्या भरात केलेल्या या खूनाची चर्चा सगळीकडे रंगली होती. आयटी हब असणाऱ्या या शहरात झालेल्या खूनामुळे सोशल मीडियावर देखील वेगाने बातमी पसरली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news