

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर सापडले आहे. हे हेलिकॉप्टर सोलुखुंबूहून काठमांडूला जात होते. शोध पथकाला बेपत्ता हेलिकॉप्टरचे अवशेष आणि पाच जणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. "बेपत्ता हेलिकॉप्टर लिखू पीके ग्राम परिषद आणि दुधकुंडा नगरपालिका-२ च्या सीमेवर सापडले आहे. गावकऱ्यांनी पाच मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली," अशी माहिती कोशी प्रांताचे पोलिस डीआयजी राजेशनाथ बास्तोला यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर डोंगरमाथ्यावरील झाडावर धडकले. यातील मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
आज (दि.११) सकाळी १० च्या सुमारास त्याचा कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला होता, असे नेपाळचे नागरी उड्डाण प्राधिकरणाचे अधिकारी ज्ञानेंद्र भुल यांनी सांगितले होते. बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये ५ परदेशी नागरिकांचा समावेश होता.
द काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, मनांग एअर फ्लीटचा एक भाग असलेल्या हेलिकॉप्टरने सकाळी 9.45 वाजता काठमांडूच्या दिशेने उड्डाण केले. त्यानंतर 15 मिनिटांतच त्याचा संपर्क तुटला. सोलुखुंबूमधील सुर्की येथून सकाळी ९.४५ वाजता नेपाळची राजधानी काठमांडू येथे उड्डाण केले होते.
हेही वाचा