Dr S. Jaishankar: राज्यसभा निवडणुकीसाठी गांधीनगरमधून डॉ. एस जयशंकर यांचा अर्ज दाखल | पुढारी

Dr S. Jaishankar: राज्यसभा निवडणुकीसाठी गांधीनगरमधून डॉ. एस जयशंकर यांचा अर्ज दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क: परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर (Dr S. Jaishankar) यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी गुजरातच्या गांधीनगरमध्ये आज (दि. १०) उमेदवारी अर्ज दाखल केला.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर डॉ. एस जयशंकर (Dr S. Jaishankar) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, सर्वप्रथम मी पंतप्रधान मोदी, भाजप नेतृत्व आणि गुजरातच्या आमदारांचे आभार मानू इच्छितो. चार वर्षांपूर्वी मला राज्यसभेत गुजरातचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. गेल्या ४ वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या बदलांचा एक भाग बनण्याची संधी मला मिळाली. मला आशा आहे की, राज्यात होणाऱ्या प्रगतीत मी योगदान देऊ शकेन.

हेही वाचा 

Back to top button