

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळच्या अलपुळ्ळा जिल्ह्यात ''मेंदू खाणाऱ्या अमिबा' ची लागण झाल्यामुळे एका (पीएएम) १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा एक दुर्मिळ संसर्ग आहे जो आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो. याची लागण झाल्यानंतर मृत्यूची शक्यता वाढते. ही स्थिती Naegleria fowleri मुळे झालेल्या संसर्गानंतर उद्भवते, ज्याला 'ब्रेन-इटिंग अमिबा' असेही म्हणतात.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी लोकांना आश्वासन दिले की, पीएएम एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. रुग्णाचे नमुने जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये हस्तांतरित करण्यात आले असून त्यांची सविस्तर तपासणी केली जाईल.